बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना 2025 Update

योजनेची घोषणा

राज्य शासनाने दिनांक 19 जून 2025 रोजी बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे. योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर वार्षिक पेन्शन देण्यात येणार आहे.

पात्रता निकष (Eligibility Criteria):

 

  • वय:

    • कामगाराचे वय किमान 60 वर्ष पूर्ण असावे.

  • नोंदणी कालावधी:

    • सातत्याने 10 वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंद असावी.

  • पती-पत्नी दोघेही कामगार असल्यास:

    • दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शनचा लाभ मिळेल.

    • पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर उर्वरित व्यक्तीस फक्त स्वतःचेच पेन्शन मिळेल, जोडीदाराचे पेन्शन हस्तांतरित होणार नाही.

  • इतर पेन्शन लाभ:

    • ज्या कामगारांना केंद्र सरकार/ESIC यांच्याकडून इतर पेन्शन लाभ मिळत आहेत, ते या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत.

    • राज्यातील
      नोंडणीकृत बांधकाम कामगाराला राज्य शासनाच्या माध्यमातून पेन्शन दिली जाणार आहे
      याच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हीच पेन्शन कशा प्रकारे दिली जावी
      कोणत्या बांधकाम कामगाराला या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे याच्यासाठीच्या अटी
      शर्ती काय असतील अर्जाचा नमुना या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून
      घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा
      GR आज 19 जून 2025 रोजी निर्गमित
      करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून नोंदीत
      बांधकाम
      कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची एसओपी अर्थात सविस्तर
      कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे.

      मित्रांनो वयाचे
      60 वर्ष पूर्ण झालेल्या महामंडळाकडे नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना पेन्शन
      देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने काही पात्रतेचे निकष
      देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेले आहेत. जे नोंदीत
      बांधकाम कामगार आहेत ज्यांची सलग किमान 10 वर्ष नोंद आहे अशा बांधकाम कामगारांना
      ही पेन्शन लागू राहणार आहे.

       याच्यामध्ये कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही
      बांधकाम
      कामगार असतील तर त्या दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळणार
      आहे. पतीपत्नीचा जर मृत्यू झाला तर त्या बांधकाम कामगाराचे पतीपत्नी अर्थात
      पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीस किंवा पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीस निवृत्ती वेतना
      करता पात्र राहणार आहे. तथापि पती-पत्नी सदर योजने अंतर्गत निवृत्ती वेतन मिळत
      असेल तर संबंधितांना दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.

      अर्थात
      पती-पत्नीला दोघांना जर निवृत्ती वेतन मिळत असेल आणि याच्यापैकी एकाचा मृत्यू झाला
      तर त्याचं जे पेन्शन असेल ते दुसऱ्याला मिळणार नाही. केंद्र शासनाच्या आदर्श
      कल्याणकारी योजनाच्या मार्गदर्शक
      तत्त्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा
      यानुसार जे काही तरतुदी आहेत जर या लाभार्थ्यांना जर दुसरे काही पेन्शन किंवा इतर
      काही जर लाभ मिळत असतील तर ते या निवृत्ती वेतना करता लागू राहणार नाहीत आता
      याच्यामध्ये निवृत्ती वेतन किती दिलं जाणार आहे.

      याच्यामध्ये 10
      वर्ष किमान जर नोंदणी असेल तर 50% अर्थात 6000 रुपये वार्षिक निवृत्ती वेतन दिलं
      जाणार आहे 15 वर्ष जर नोंदणी असेल तर 75% अर्थात 9000 रुपये आणि ज्या बांधकाम
      कामगाराची सलग 20 वर्ष नोंदणी असेल अशा बांधकाम कामगारांना 100 टक्के अर्थात
      वार्षिक 12000 रुपये

      एवढं निवृत्ती
      वेतन दिलं जाणार आहे याच्यामध्ये पती आणि पत्नी दोघे जर नोंदणी करत असतील तर त्या
      दोघांना देखील 12000 रुपये सेपरेट असे या ठिकाणी निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन दिली
      जाणार आहे. याची जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली
      आहे.

      याच्यासाठी
      अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे. हा विनामूल्य अर्जाचा नमुना या ठिकाणी
      द्यावा लागणार आहे पेन्शनसाठी सदरचा अर्ज भरत असताना नोंदीत बांधकाम कामगारांना
      त्याचा आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा
      केंद्राच डब्ल्यूएफसी च यांच्याकडे हा
      अर्ज जमा करायचा आहे अर्ज
      जमा करत असताना कागदपत्र पत्त्याचा पुरावा आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा
      जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि बँकेच खातं

      केलाय ही माहिती
      याच्यामध्ये द्यायची आहे बँक खात्याचा तपशील द्यायचा बँकेच च नाव पासबुक
      साक्षांकित छायाप्रत ही या ठिकाणी कागदपत्र द्यायचे आहेत मित्रांनो याच्यासाठी एक
      अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे.

       अर्जाचा नमुना आपण याठिकाणी पाहू शकता प्रपत्र
      बांधकाम कामगाराच नाव याच्यामध्ये द्यायचे बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक आधार
      नंबर जन्मतारीख वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची तारीख प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक
      प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण नोंदणी

      कालावधीचा तपशील
      कधी कधी नोंदणी झालेली आहे त्याच नुतनीकरण कधी केलेल आहे नुतनीकरणाचा जे काही
      कालावधी असेल जी डेट असेल ती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये खाते क्रमांक आयएफएससी कोड
      इतर कुठल्याही पेन्शनचा किंवा इतर पीएफ वगैरेचा लाभ घेत नाही याच्याबद्दलची माहिती
      आणि वरती भरलेली सर्व माहिती खरी आहे खोट्या अढळ्यास कारवाई करण्यात यावी अशा
      प्रकारची सहमती देऊन बांधकाम कामगाराला स्वतःच नाव देऊन या ठिकाणी सही करायची आहे.
      याच्यासाठी एक शिफारस पत्र दिल जाणार आहे

      कार्यालयाच्या
      माध्यमातून याच्यासाठी प्रपत्र ब देण्यात आलेल आहे आणि याच्यासाठी वर्षनिहाय
      नोंडणी प्रमाणपत्र देखील दिल जाणार आहे. त्याच्यासाठी प्रपत्र क असणार आहे. अर्थात
      अर्जदाराचा अर्ज आल्यानंतर ही दोन प्रमाणपत्र त्याच्यासोबत जोडली जाणार आहेत.
      याच्यानंतर प्रपत्र ड कार्यालयन कामकाजासाठी आहे आणि अशा प्रकारचे अर्जाच्या
      नमुन्यासह हा
      GR निर्गमित करून राज्यातील बांधकाम कामगारांना
      ज्यांची सलग किमान
      10 वर्ष नोंडणी आहे
      अशा बांधकाम कामगारांना ही निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. हे
      निवृत्ती वेतन देण्यासाठी मंजुरी देण्यात
      आलेली आहे.

      जे बांधकाम
      कामगार जुन्या नोंदण्या आहेत ज्यांची 20 वर्ष नोंदणी झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना
      वार्षिक 12000 रुपये एवढी पेन्शन आता मिळणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा GR आहे 
      आपण महाराष्ट्र शासनाच्या https://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर GR पाहू शकता.

निवृत्ती वेतन रक्कम (Pension Amount):

नोंदणी कालावधीवार्षिक पेन्शनमासिक अंदाजे
10 वर्ष₹6000 (50%)₹500
15 वर्ष₹9000 (75%)₹750
20 वर्ष₹12000 (100%)₹1000

1 thought on “बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना 2025 Update”

  1. Pingback: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme | राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - sarkari yojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top