नमो शेतकरी महासन्मान निधी हप्त्याचे काय | PM किसान योजनेचा 20 वा हप्ता कुठे अडकला?

नमो शेतकरी महासन्मान निधी हप्त्याचे काय?

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. मात्र, दोन्ही योजनांचे हप्ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि यामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

PM किसान योजनेचा 20 वा हप्ता कुठे अडकला?

  • देशभरातील शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी पीएम किसान योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे.

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 हप्ता स्वरूपात दिले जातात.

  • जून महिन्यात FTO तयार होऊनही 1-1.5 महिने उलटून गेले, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

  • कृषी विभागाने फेक अपडेटवर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट केले असून अधिकृत अपडेट लवकरच येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी हप्त्याचे काय?

  • राज्य शासनाची नमो योजना देखील पीएम किसानप्रमाणेच शेतकऱ्यांना ₹6000 दरवर्षी देण्याची तरतूद करते.

  • या योजनेचा हप्ता PM किसान योजनेनंतरच पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जातो.

  • परंतु PM किसान हप्त्यातच विलंब झाल्यामुळे नमो हप्ताही पुढे ढकलला जात आहे.

  • sarkariyojana.store

  • pmkisan.gov.in

निधीची तरतूदच नाही?

  • नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात नमो योजनेसाठी निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही.

  • ना GR काढण्यात आलेला आहे, ना पुढील हप्ता कधी येईल याबाबत कुठली स्पष्टता आहे.

  • उलट, पीक विमा योजना बंद करून त्याचा निधी कृषी समृद्धी योजनेला वळवला जातोय, असा आरोप देखील आहे.

PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता वितरणात विलंब

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार हा एक राज्यातील शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना मात्र मित्रांनो या योजनेचा विसाव हप्ता वितरित केला जात असताना मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली जात आहे.

जून महिन्यामध्ये एफटीओ तयार झालेले असतानासुद्धा तब्बल एक ते दीड महिन्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही या पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

ज्याच्या अंतर्गत केंद्राप्रमाणेच राज्य शासनाच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरित करण्यात येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत पात्र असलेले जे शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्ता वितरित केला जातो.

आता पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यासाठीच उशीर झालाय मग याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता कधी वितरित केला जाणार हा देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे आता पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यासाठी उशीर होतोय त्याच्या संदर्भातील कुठलेही अपडेट नाहीत परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जर वितरित केला जात नसेल तर याच्यामध्ये का विलंब होतोय याच्यासाठी निधीची तरतूद का केली जात नाही

हे देखील अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत कारण मित्रांनो राज्यामध्ये पीक विमा योजना एक रुपयामध्ये दिली जात होती ती बंद करण्यात आले त्याचा निधी जो आहे तो कृषी समृद्धी योजनेला वापरला जाणार आहे इतर काही अनावश्यक योजना किंवा इतरे काही शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी आहे तो डायरेक्टली कृषी समृद्धी योजनेला वापरला जाणार आहे असं सांगण्यात आलेले आणि असं सांगण्यात आल्यामुळे त्या वार्षिक पाच हजार कोटी रुपयाच्या तरतुदीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा बळी तर दिला जाणार नाही ना असा एक प्रश्न देखील शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे.

आपण पाहिलं होत की आता सध्या पावसाळी अधिवेशन पार पडलं याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही किंवा या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी जे काही आवश्यक निधीची गरज आहे त्याच्यासाठीचा कुठला जीआर निर्गमित करण्यात आलेला नाही.

मग अशा प्रकारे आतापर्यंत निधी वितरित करण्यात आलेला नाही. निधीची तरतूदही करण्यात आलेली नाही. किंवा या योजनेचा पुढील हप्ता कधी वितरित केला जाणार आहे. याच्या संदर्भातील कुठली अपडेट ही देण्यात आलेली नाही. या पार्श्वती आता नेमकी योजना पुढे कशी राबवली जाणार? तर याचा हप्ता कधी वितरित केला जाणार? हे सर्व प्रश्न आता गोलदस्त्यामध्ये पडलेले येतात.

कृषी विभागाच्या माध्यमातून नेमका याचा हप्ता कधी दिला जाऊ शकतो? याच्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे का? शेतकऱ्यांमध्ये पडलेले जे काही हजारो प्रश्न आहेत याची उत्तर त्यांच्या माध्यमातून कुठेतरी काढणं गरजेचे आहे. कारण मित्रांनो एकंदरीत पीएम किसान योजनेबद्दल खूप मोठे भ्रामक पसरवले जात आहेत. आपोआप पसरवल्या जात आहेत. याच्यावरती विश्वास ठेवू नये म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून प्रेस नोट काढण्यात आली.

तशा प्रकारची माहिती देण्यात आली की कुठल्याही प्रकारच्या अपवांवरती विश्वास ठेवू नका. नवीन अपडेट लवकरच दिले जातील अधिकृत दिले जातील आणि अशीच गरज आहे आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कितीतरी जिल्हा माहिती कार्यालय आहेत प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा माहिती कार्यालय आहेत राज्यस्तरीय माहिती कार्यालय कृषी विभाग आहे किंवा मंत्री महोदय आहेत लोकप्रतिनिधी आहेत याच्या संदर्भात काम करणारे अधिकारी आहेत

यांच्या माध्यमातून कुठेतरी पुढे येऊन या योजनेचा हप्ता वितरित करण्यामध्ये विलंब का होतोय विलंब जरी झाला तरी हप्ता वितरित केला जाणार आहे का किंवा या योजनेचा निधी कृषी समृद्धी योजनेला वळवण्यात तर येणार नाही ना अशा प्रकारचे जे सर्वसामान्याला पडलेले प्रश्न येतात त्याची उत्तर देणं गरजेचे आहे

आणि लवकरात लवकर ती द्यावीत आणि शेतकऱ्याच्या मनातील संभ्रम दूर करावा हीच एक अपेक्षा आहे अन्यथा ही योजना सुद्धा गुलदस्त्यामध्ये गेली असाच एक शेतकऱ्यांचा समज होणार आहे            

FAQs

जून महिन्यात FTO तयार झाले असूनही अद्याप हप्ता वितरित झालेला नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार, लवकरच अधिकृत अपडेट जाहीर केला जाणार आहे.

नमो योजनेचा हप्ता PM किसान हप्त्यानंतर दिला जातो. त्यामुळे पीएम किसान हप्त्यात उशीर झाल्यामुळे नमो योजनेचा हप्ता देखील लांबणीवर आहे.

सध्या अशी कोणतीही अधिकृत घोषणा नाही. मात्र योजनेसाठी निधीची तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

जे शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांना त्याचा हप्ता मिळतो, त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळतो.

आपल्या तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, किंवा जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. PM किसान पोर्टलवर देखील तक्रार नोंदवता येते.

रुपयात देण्यात येणारी योजना बंद झाली असून संबंधित निधी कृषी समृद्धी योजनेत वळवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेवटी एकच अपेक्षा...

शेतकऱ्यांना वेळेत हप्ते मिळावेत, योजनांमध्ये पारदर्शकता असावी आणि निधीच्या वितरणात कोणताही राजकीय अथवा प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार आहे, आणि त्यावर कुठल्याही प्रकारे गदा येता कामा नये.

धन्यवाद! 🙏

धान उत्पादकांसाठी 20,000 ₹ प्रति हेक्टर बोनस | तुमचं बँक व्हेरिफिकेशन झालं का?

धान उत्पादकांसाठी 20,000 ₹ प्रति हेक्टर बोनस | तुमचं बँक व्हेरिफिकेशन झालं का?

परिचय

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर २०,००० रुपये बोनस जाहीर केला होता, जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत म्हणजेच एका शेतकऱ्यासाठी ४०,००० रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी १८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हा बोनस जमा झालेला नाही. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी वाट पाहत आहेत. आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण या बोनस वाटपातील अडचणी, नवीन सुरु झालेली बँक व्हेरिफिकेशन प्रक्रिया आणि तक्रार निवारणाची माहिती जाणून घेणार आहोत.

तुमचं बँक व्हेरिफिकेशन झालं का?

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यशासनाच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हज रुपयाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता आणि याच बोनसच्या वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हज रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त 40 हज रुप पर्यंत हा बोनस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती.

परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या धानाच्या बोनसच वितरण करण्यात आलेल नाही राज्यातील लाखो शेतकरी या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच्यासाठी विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता.

यापूर्वी सुद्धा आपण पाहिल होत की धानाचा बोनस वितरित करत असताना किंवा याच्यामध्ये नोंदणी करत असताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार दिसून आलेले होते त्याच्यावरती चौकशी लागलेली होती आणि चौकशी झाल्यानंतर आता या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली होती. 1800 कोटी रुपयाचा निधी तरतुदीत करण्यात आलेला होता याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 900 कोटी रुपयाच वितरण करून शेतकऱ्यांना या धानाचा बोनस वितरित करायला सुरुवात केलेली होती.

याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून धानाच्या बोनसच वाटप करण्यात आलेल होतं परंतु ज्या शेतकऱ्यांचा अद्याप धानाची विक्री झालेली नाही असे काही शेतकरी आणि ज्यांची धानाची विक्री झालेली आहे परंतु काही त्यातील शेतकरी हे सुद्धा अद्याप धानाच्या बोनसच्या वितरणापासून वंचित होते आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे या जे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी धानाच्या बोनससाठी आपली नोंदणी केलेली आहे

विक्री झालेली असो किंवा नसो त्यां त्यांच्या बँकेचं व्हेरिफिकेशन ही एक प्रक्रिया याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की धानाच्या बोनससाठी नोंदणी आवश्यक ईपीक पाहणी आवश्यक पुन्हा त्याच्यामध्ये तपासणी आणि आता तपासणीनंतर नवीनच याच्यामध्ये बँक व्हेरिफिकेशन ऍड करण्यात आलेले आहे.

अतिवृष्टी किंवा जे काही इतर गारपीट वगैरे असेल याच्यामध्ये जशी केवायसी केली जाते तशाच प्रकारची काहीशी केवायसी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच नाव त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्यानी दिलेल्या बँकेच्या अकाउंटचे डिटेल या बरोबर आहेत का याच्या माध्यमातून तपासल्या जात कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नोंणी जरी बरोबर झालेली असली तरी त्या शेतकऱ्याच्या नावाबरोबर आधार बरोबर चुकीच बँक अकाउंट जोडल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत

आणि याच्याचमुळे राज्यशासनाच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांची जी बिम्स प्रणालीवरती यादी अपलोड करण्यात आलेली आहे या यादीमध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड माहिती बरोबर आहे का ही तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म याच्यामध्ये धानाच्या बोनस साठी धानाच्या विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी ज्यांची विक्री झालेली असेल किंवा नसेल परंतु धान बोनस वितरीत करण्यात आले नाही अशा शेतकऱ्यांची याच्यावरती माहिती अद्यावत करण्यात आलेली आहे

आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहेत किंवा काही याच्यामध्ये काही दुरुस्ती आलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे नाव आधार कार्ड नंबर बँक व्हेरिफिकेशन हे बँक व्हेरिफिकेशन याच्या माध्यमातून पार पाडल जात आहे आपल्याला जर अद्याप दहानाचा बोनस

मिळालेला नसेल तर आपल्या बँक अकाउंट व्हेरिफिकेशन च प्रक्रिया बाकी आहे का हे तपासण्याचा प्रयत्न करा आणि जर ती प्रक्रिया बाकी असेल तर आपण नोंदणी केलेल्या संस्थेकडे ती प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुठल्याही प्रकारच शुल्क आकारल जाऊ नये अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत निशुल्क ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे

त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन तपासल जाणार आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या तात्काळ बोनसच वितरण केल जाणार आहे याच्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्याची नोंदणी झालेल असण आवश्यक आहे

त्या शेतकऱ्याची पीक पाणी झालेला असण आवश्यक आहे आणि हे बँक व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते वितरण या ठिकाणी केल जाणार एक नव्याने समाविष्ट करण्यात आलेली प्रक्रिया मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आला की चुकीच्या पद्धतीने नोंदण्या करण्यात आलेल्यात आता जर या व्हेरिफिकेशन मध्ये जर समजा व्हेरिफिकेशन बरोबर आहे म्हणून सांगून जर अकाउंट जोडण्यात आले जर धानाच्या बोनस जर गैर प्रकारे वितरण केल

गेलं तर त्याच्यामध्ये तरी काय अडवडू शकते तर ही एक निवळ आता याच्यामध्ये वेळ काढू प्रक्रिया ऍड करण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्यांना ही माहिती असावी म्हणून आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे

जर आपला धानाचा बोनस वितरित झालेला नसेल तर आपण ज्या संस्थेकडे नोंडणी केलेली आहे आपण ज्या संस्थेकडे आपल्या धानाची विक्री केलेली अशा संस्थेकडे संपर्क करा आणि जर याच्यासाठी आपल्याला जर काही पैशाची मागणी कोणी करत असेल तर आपल्या पणन जिल्हा जे पणन महासंघ आहे त्यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करा

1) sarkariyojana.store

2) parbhudeva 

धन्यवाद

FAQs

ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान उत्पादन केलं असून अधिकृत नोंदणीकृत संस्थेमार्फत विक्री केली आहे, तसेच नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.

शेतकऱ्याच्या नावावरचं खातं, आधार क्रमांक आणि खात्याचं IFSC कोड तपासून खातं वैध आहे की नाही याची शासनाच्या प्रणालीत पडताळणी केली जाते.

ज्या संस्थेकडे (सेल्फ हेल्प ग्रुप / कृषी उत्पन्न बाजार समिती / सोसायटी) तुम्ही नोंदणी केली आहे, तिथे जाऊन बँक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणीत बँक खात्याची माहिती चुकीची आहे, किंवा आधारशी जुळत नाही. त्यामुळे आता बँक व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यात जमा होतील.

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, धानाच्या बोनससाठी बँक व्हेरिफिकेशन ही एक नवी पण आवश्यक प्रक्रिया आहे. चुकीची माहिती देऊन गैरप्रकार होऊ नये यासाठी शासनाकडून ही पायरी उचलण्यात आलेली आहे. जर आपल्याला अजून बोनस मिळालेला नसेल, तर तात्काळ आपल्या नोंदणी संस्थेकडे किंवा जिल्हा पणन कार्यालयाशी संपर्क करा. कोणतीही आर्थिक मागणी होत असल्यास त्याबाबत तक्रार करावी. शासनाने दिलेला बोनस प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हाच उद्देश आहे.

PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता अपडेट – जुलै 2025 मध्ये खात्यावर पैसे कधी येणार?

PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता अपडेट – जुलै 2025 मध्ये खात्यावर पैसे कधी येणार?

PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता अपडेट

नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांना पडलेला एक महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार कुठलाही व्हिडिओ आला तरी त्याच्यावरती येणारी पहिली कमेंट किंवा व्हिडिओवरती येणाऱ्या बहुसंख्य कमेंट या पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भातीलच असतात आणि याच्याचमुळे या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता कधी क्रेडिट केला जाणार? याच्या संदर्भातील उपलब्ध असलेली आणि महत्त्वाची अशी माहिती आजच्या या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .

आज 4 जुलै पर्यंत शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या संदर्भातील अधिकृत अशी तारीख जाहीर केलेली नाही. मित्रांनो ही तारीख 9 जुलै 2025 नंतर जाहीर केली जाणार आहे.

PM Kisan हप्ता अपडेट: 13-18 जुलै दरम्यान पैसे खात्यात येणार का?

9 जुलै 2025 नंतर पीएम किसानचा पुढील हप्ता अर्थात या योजनेचा विसावा हप्ता क्रेडिट  केला जाईल याची तारीख जाहीर केली जाणार आहे जी तारीख साधारणपणे 13 ते 14 जुलै असू शकते. मित्रांनो 13 ते 14 जुलैला या पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल आणि हप्ता 13 ते 14 जुलै पासून 18 जुलैच्या दरम्यान किंवा 18 जुलैलाच वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

तशा प्रकारचे अपडेट सध्या समोर येत आहेत. मित्रांनो सध्या पंतप्रधान बाहेर देशामध्ये आहेत. परदेशाच्या दौऱ्यावरती आहेत. ते दौऱ्यावरून परतल्यानंतर याच्या संदर्भातील कार्यक्रमाची रूपरेषा आकली जाईल त्याच्यासाठीची तारीख जाहीर केली जाईल.

जी तारीख 9 जुलै नंतरच जाहीर केली जाणार आहे साधारणपणे ते 13 किंवा 14 जुलैला जाहीर केली जाऊ शकते आणि 18 जुलै पर्यंत या हप्त्याच वितरण केलं जाऊ शकतं अशा प्रकारच्या या शक्यता आहेत अशा प्रकारचे अपडेट आहेत आणि अपडेट 100% खरे होतील अशी एक शक्यता आहे.  

कारण आतापर्यंत आपल्याकडे आलेले अपडेट कधी आपण फसवे दिलेले नाहीत आणि सध्या सुद्धा येत असलेले अपडेट विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून येत आहेत आशा करूया हा हप्ता 18 जुलै पूर्वीच लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मध्ये क्रेडिट केला जाईल.

तारीख मात्र 9 जुलै पूर्वी या योजनेच्या हप्त्याची वितरित करण्याची तारीख जाहीर केली जाणार नाही आता हे पीएम किसानच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील याच्यानंतर नमो शेतकरी पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर याच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो.  

आणि या बेसवरती जे काही लाभार्थी पात्र होतील साधारणपणे 93 लाख30 हजाच्या आसपासचे लाभार्थी हे पीएम किसानच्या हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तेवढ्या लाभार्थ्याला नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.

आता नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यापूर्वीच दोन दिवस त्याच्या संदर्भातील अपडेट येत कारण त्याच्या संदर्भातील निधी वितरणाचा जीआर निर्गमित केला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातील आता या पूर्वी मागणीमध्ये सुद्धा जे काही आता सध्या पूर्वी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत.  

त्याच्यामध्ये सुद्धा या हप्त्यासाठीच जे बजेट किंवा तरतूद करण्यात आलेली आहे आता पूर्वीचे किती पैसे वितरित आहेत की आणखीन याला वाट पाहावी लागते हे देखील सर्व याठिकाणी आता पाहण्यासारख आहे आणि पीएम किसानचा हप्ता आल्यानंतरच पुढे काही दिवसाच्या कालावधीनंतर नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जातो तो आता हे उशीर होण्याच कारण सांगितलं जातय ज्या लाभार्थ्यांच व्लंटरी सरेंडर झालं होतं त्यांच्या केवायसी किंवा केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे केवायसी किंवा चुकीच्या पद्धतीने काही बाद झालेले शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट करणं ही न पटण्यासारखे कारण याच्यामध्ये सांगितली जात आहेत.  

आणि सगळी कारणं पूर्ण करून हप्ता वितरित करण्याचा प्रयत्न केला आता हा हप्ता कधीही वितरित झाला 13 जुलैला 14 जुलैला किंवा 18 जुलैला पण तुमचा तो हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे का हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे कारण याच्यासाठी आरएफटी साईन झालेले आहेत याच्यासाठी जेव् जनरेट झालेले आहेत तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार का हे सुद्धा तुम्ही त्यापूर्वी तपासून पहा तुमची एलिजिबिलिटी तपासून पहा आणि जर हप्ता तुम्हाला येणार असं जर दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा निश्चित केलेल्या जाहीर केलेल्या तारखेला हप्ता क्रेडिट केला जाईल.

शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in वर जाऊन आपली पात्रता आणि हप्ता स्थिती तपासावी

नवीन माहिती साठी  sarkariyojana.store 

धन्यवाद

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत सरकारने अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनुसार 9 जुलैनंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 ते 18 जुलै 2025 दरम्यान हा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. तुम्ही पात्र लाभार्थी आहात का, हे तपासून घ्या आणि आपल्या खात्याची KYC स्थिती पूर्ण आहे का तेही पाहा. योग्य त्या तारखेला हप्ता मिळण्यासाठी हीच तयारी आवश्यक आहे. शेवटी, आपल्या खात्यावर रक्कम कधी जमा होईल हे समजण्यासाठी अधिकृत अपडेटची वाट पाहणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

फार्मर आयडी बंधनकारक! 2025 पीक विमा योजनेतील महत्त्वाचे बदल

फार्मर आयडी बंधनकारक! 2025 पीक विमा योजनेतील महत्त्वाचे बदल

परिचय

फार्मर आयडी बंधनकारक

मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ आणि कधी कधी पिकांवरील रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना (PMFBY) राबवली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या योजनेचा हेतू बाजूला राहून, त्याचा गैरवापर होऊ लागला आहे. एक रुपयात विमा हप्ता लागू करून देखील शेतकऱ्यांपर्यंत खरी मदत पोहोचली नाही. बोगस पॉलिसी, बनावट फार्मर आयडी, चुकीची जमीन माहिती आणि नोंदणीमध्ये अपारदर्शकता यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर 2025 साली शासनाने सुधारित पीक विमा योजना लागू केली असून, त्यात अनेक कठोर नियम व दंडात्मक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले असून, चुकीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी कोणत्याही कृषी योजनेपासून वंचित ठेवण्याची तरतूद आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये आपण या नव्या बदलांवर सविस्तर माहिती घेणार आहोत – फायदे, धोके, आणि शेतकऱ्यांनी यामध्ये कशी काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती वाचायला विसरू नका.

नियम व आटी

नमस्कार मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी परंतु शेतकऱ्यांनाच लाभापासून वंचित ठेवणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे पीक विमा योजना मित्रांनो गेल्या चार ते पाच वर्षापासून या योजनेमध्ये प्रत्येक सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी काही ना काही तरी बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जसे याच्यात नवनवीन बदल केले गेले तसे शेतकरी लाभापासून दूरच होत गेले आणि मित्रांनो आत्ता सुद्धा 2025 मध्येसुद्धा सुधारित पीक विमा योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे.

जुन्याच योजना जुनेच नियम जुनीच सगळी पद्धती परंतु शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये करण्यात आलेला हप्ता हा आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आणि अशा प्रकारची योजना राबवली जात असताना याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आपण पाहिलं होत की 2024 हे पिकविमा योजनेसाठी अतिशय खराब असं वर्ष दिसून आलं एक रुपयामध्ये पिकविमा योजना राबवण्यात आली आणि पर्यायाने योजनेचा लाभ घेण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला गेलायाच्यामध्ये बोगस पॉलिसी भरण्यात आल्या बोगस पॉलिसी भरून त्याच कमिशन लाटण्यात आलं याच्यामधून पीक विमाचा जे काही लाभ आहे तोही लाटण्याचा प्रयत्न करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला गेला होता परंतु ते कुठेतरी पकडण्यात आलं आणि जे काही बोगस पीक विमा जे प्रकरण आहे ते समोर आलं आणि याच पार्श्वभवती शासनाच्या माध्यमातून काही गंभीर अशी पावल उचलण्यात आलेले होते.

मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतल होत की पीक विमा योजनेतील बदल सुचवण्यासाठी एक वरिष्ठ स्तरीय समिती घटित करण्यात आलेली होती. या समितीच्या माध्यमातून शासनाला अहवाल देण्यात आला पीकविमा योजनेतील बदल सुचवण्यात आले आणि याच्यामध्ये काही जे काही या योजनेचा दुरुपयोग करतात याच्यावरती निर्बंध आणण्यासाठी जे काही पर्याय सुचवण्यात आले ते पर्याय आता लागू करण्यात आले मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर देवस्थानच्या असलेल्या जमिनी किंवा भाडेपट्टे चुकीच्या पद्धतीने करार करून त्याच्यावरती पीकविमा भरणं पोट खराबीच्या क्षेत्रावरती पीकविमा भरणं असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावरती पिकोमा भरणं आता बऱ्याच साऱ्या जमिनीचा रेकॉर्ड आपण पाहिल होत डिजिटल झालेल नव्हतं काही ठिकाणी ट्रेसेबिलिटी तांड्याच्या जमिनी वगैरे होत्या अशा ठिकाणी पीक विमा भरणं कमी क्षेत्र आणि जास्त क्षेत्राचा पिकमा भरणं तुकड्या तुकड्याच्या क्षेत्राच्या अनेक पॉलिसी जनरेट करणं अशा प्रकारचे काही प्रकार देखील घडून आलेले होते आणि अशा प्रकारे जर याच्यामध्ये जर काही प्रकार निदर्शनास आला तर ती पॉलिसी पहिली तात्काळ बाद करण्यात येणार आहे.  

पहिलेही बाद करण्यात येत होते आता त्याच्यामध्ये आणखीन निर्बंध घालण्यात आलेले अशा पॉलिसी वरती जर काही समजा दिसून आलं म्हणजे जर त्याच्यामध्ये काही जर चुकीचं दिसून आलं तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो आता एवढ्यावरच हे नाही आता ज्या फार्मर आयडी वरून किंवा ज्या जमिनीवरती हे पीक विमे अशा प्रकारे बोगस भरले जातील अशा लाभधारकाला अशा फार्मर आयडी कारण याच्यामध्ये आपण पाहिलेल आहे.

की या नव्या नियमानुसार पीक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी हा बंधनकारक करण्यात आलेला आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला अर्थात फार्मर आयडी हा त्या जमिनीसाठीच बनतो की जी जमीन त्या लाभार्थ्याची आहे आता याच्यामध्ये बीड आणि जालना काही भागातून बरीच सरी प्रकरण समोर येतात की चुकीच्या पद्धतीने फार्मर आयडीसी जमिनी जोडणं वडिलाची जमीन मुलाच्या नावावर गावातील चार पाच लाभार्थ्याची जमीन सामायिक म्हणून स्वतःच्या नावावर अशा अनेक सारे प्रकार आता दिसून यायला लागलेले ज्या फार्मर आयडी आता जनरेट झालेल्या आहेत त्या फार्मर आयडीचा डाटा तपासत असताना कारण ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे अग्रीस्टकचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि डिजिटल रेकॉर्ड मॅच करत असताना असे बरेच सारे फार्मर आयडी आता निदर्शनास येत आहेत.

ज्याच्यावरती लवकरच कारवाई देखील होऊ शकते अशा फार्मर आयडीचा चा वापर करून जर काही चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला गेला तर ते जे काही असतील त्यांना पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या कुठल्याही प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जाणार नाही त्याच्यामध्ये पीक विमा असेल किंवा अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणारे इतर काही योजना असतील याच्यासाठी त्या लाभार्थ्यांना ब्लॅकलिस्टेड केलं जाणार आहे आणि एकंदरीत आता हे जे काही डिजिटल सर्व झाल्यामुळे ज्या पद्धतीने पूर्वीचे प्रकार होत होते त्याच्यामध्ये बरेच सारे प्रकार आता निदर्शनाश येणार आणि सरकारला हे बोगस पिक विमाची प्रकरण किंवा बोगस लाभार्थी शोधण कर्ण सोपं जल आहे.

तर अशी ही माहिती होती पिकविमा संधारबात आपल्या ला माहिती आवडली असाल तर कॉमेट मध्ये नक्की कळवा आणि तुमला काही विचारायच असाल तर कॉमेट मध्ये कळवा

1 sarkariyoojana.store hi aapli web saite aahe

2 prabhu deva youtube ya varti aajun mahiti bhetel