सौर कृषी पंप तक्रार ऑनलाइन काशी करायची ते पहा 2025

सौर कृषी पंप तक्रार ऑनलाइन काशी करायची ते पहा

सौर कृषी पंप तक्रार नोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन)

जर तुमच्या शेतातील सोलर पंप चालत नसेल, पॅनल डॅमेज झाला असेल, पंप पाणी कमी फेकत असेल किंवा चोरी झाल्यासारख्या काही समस्या असतील, तर त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटांत तक्रार दाखल करून निवारण मागू शकता.

जय तुमच्या शेतातील सोलर पंप चालत नसेल किंवा पॅनल डॅमेज झालेला असेल एखादा सोलर पॅनल त्याच्यामध्ये चोरी झालेला असेल किंवा तुटलेला असेल किंवा तुमचा जो काही लावलेला पंप आहे तो पाणी कमी फेकत असेल अशा जर काही तक्रारी सोलर पंपाच्या तुमच्या असतील तर त्या तुम्ही अगदी दोन मिनिटामध्ये ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकता आणि याच्या संदर्भातील माहिती आज च्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

याच्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टल वरती शेतकऱ्यांना आता ही तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार निवारण नावाची ऑप्शन देण्यात आलेली आहे. याच्यासाठीची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे.

याच्यामधील तक्रार निवारण वरील तक्रार नोंदवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो तक्रार नोंदवावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची तक्रार देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली माहिती विचारली जाईल. ज्याच्यामध्ये तुमचा बेनिफिशरी नंबर किंवा याच्यामधून तुमचा मोबाईल नंबर याच्यानुसार तुम्ही सर्च करू शकता. किंवा तुमचा जिल्हा तालुका गाव आणि त्याच्यामधील आपल लाभार्थ्याचे नाव आणि नानाव यानुसार सुद्धा आपण सर्च करू शकता आपल्याला बेनिफिशरी नंबर माहित असेल तर बेनिफिशरी नंबर टाकायचा आहे

किंवा आपला जो काही लिंक केलेला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून याच्यामधून सर्च करायचे आणि सर्व माहित नसेल तर आपल्याला जिल्हा तालुका गाव आणि आपला आडनाव किंवा नाव यानुसार सर्च करून आपली माहिती या ठिकाणी शोधायची आहे.

माहिती सर्च झाल्यानंतर आपल्याला याठिकाणी आपला जो काही बेनिफिशरी नंबर असेल तो दाखवेल नाव दाखवेल त्याच्यानंतर आपल्या जे काही सोलर पंप लागलेला आहे त्याची कंपनी दाखवली जाईल याच्याखाली आपला पंप इन्स्टॉल झालेली त्याची स्टेटस दाखवली जाईल आणि याच्यानंतर पंप नॉट वर्किंग सोलर पॅनल डॅमेज सोलर सिस्टम नॉट वर्किंग थेप टॉप पॅनल वर पंप किंवा याच्यानंतर लो वॉटर फ्लो लो वॉटर प्रेशर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी याठिकाणी दाखवल्या जात आहेत

आणि याच्यामधून आपली जी काही तक्रार असेल ती तक्रार आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे तक्रार निवडल्यानंतर त्याच खाली डिस्क्रिप्शन देण्यासाठी ऑप्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये आपली जी काही थोडक्यात तक्रार असेल ती तक्रार याच्यात द्यायची पंप चोरीला गेलाय पॅनल चोरीला गेलाय तुटलाय वाऱ्याने तुटलाय किंवा इतर काही असेल ते आपण या ठिकाणी लिहू शकता

सौर कृषी पंप तक्रार नोंदणी

आणि लिहिल्यानंतर खाली आपल्याला राईज कमप्लेंट वरती क्लिक करायच आहे आपला एक टेम्पररी नंबर या ठिकाणी जनरेट होईल तो नंबर आपल्याला नोट डाऊन करून पुढील आपली स्थिती तपासण्यासाठी लागणार आहे. पुढच्या आपली स्थिती तपासण्यासाठी आपल्या तक्रारीचा जो काही मागवा आहे त्याच्यावरती क्लिक करायच आपल्याला जो काही तक्रार नंबर दिलेला आहे तो तक्रार नंबर याच्यामध्ये एंटर करायच आहे

आणि सर्च वरती क्लिक करायचे सर्च केल्याबरोबर आपल्या तक्रारीची काय सध्याची स्थिती असेल ती स्थिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाणार आहे सध्या तक्रार कुठल्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये काय पुढे होतय कोणाकडे तक्रार गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव काय मोबाईल नंबर मेल आयडी ही सर्व माहिती आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता

आणि दिलेल्या संपर्क क्रमांकावरती मेल आयडीवरती आपण याच्या संदर्भातील पाठपुरावा करू शकता तर मित्रांनो अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटामध्ये आपण आपली तक्रार दाखल करू शकता

तक्रार काशी नोंदव्ययची ते पहा

सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवर जा

  • “तक्रार निवारण” (Grievance Redressal) या पर्यायावर क्लिक करा

  • आपली माहिती प्रविष्ट करा:

    • बेनिफिशरी नंबर किंवा मोबाईल नंबर
      किंवा

    • जिल्हा → तालुका → गाव → नाव / आडनाव यानुसार सर्च

  • तुमची माहिती सापडल्यावर खालील गोष्टी दिसतील:

    • नाव, बेनिफिशरी नंबर

    • सोलर पंप बसवणारी कंपनी

    • पंपची सद्यस्थिती

    • तक्रारीचा प्रकार निवडा:

      • पंप चालत नाही

      • सोलर पॅनल डॅमेज / चोरीला गेले

      • लो वॉटर फ्लो / प्रेशर

      • इतर कारणे

    • तक्रारीचा तपशील लिहा

तक्रारीची स्थिती कशी पाहाल?

  • पुन्हा पोर्टलवर जा

  • “तक्रारीची स्थिती तपासा” या पर्यायावर क्लिक करा

  • तुमचा तक्रार नंबर टाका आणि सर्च करा

  • तुमची तक्रार कुठे पोहोचली आहे, कोणावर आहे, मोबाईल नंबर/ईमेल आयडी याची सविस्तर माहिती पाहू शकता

  • सरकारी योजना – https://sarkariyojana.store/

  • मागेल तेल सोरल योजना – https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info.php

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी ₹60 कोटी निधी मंजूर

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी ₹60 कोटी निधी मंजूर

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

नमस्कार मित्रांनो राज्यातील नियमितपणे आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो आज 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने करता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्यातील राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँकाकडून अल्पमुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आपल्या पीक कर्जाची जी काही परतफेड आहे ते 30 जून पर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत अर्थात 60% दरापर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते.

याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अर्थाती शेतकऱ्यांना दिली जाणारी अल्पमुदतीची पीक कर्ज ज्यांना 60 %क्के पर्यंत व्याज दर हे सरकारच्या माध्यमातून सवलत म्हणून दिले जात आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यशासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते.

प्रत्येक वर्षी या योजनेच्या माध्यमातून 3% पर्यंत अर्थात 60% दरापर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते. मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अर्थाती शेतकऱ्यांना दिली जाणारी अल्पमुदतीची पीक कर्ज ज्यांना 60 %क्के पर्यंत व्याज दर हे सरकारच्या माध्यमातून सवलत म्हणून दिले जात आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यशासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते.

प्रत्येक वर्षी या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची 60 टक्के व्याजाची जी रक्कम आहे ती रक्कम साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये क्रेडिट केली जाते आणि यावर्षी सुद्धा अशा पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज दरामध्ये सवलत देण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत 2025-26 या आर्थिक वर्षा करता राज्यशासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केलेली आहे आणि याच्याच पैकी 60 कोटी रुपयाचा निधी आज 12 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे शेतकरी आहेत ते जे विहित मुदतीमध्ये आपल्या पीक कर्जाची परत फेड करतात ते शेतकरी पात्र होतात. याच्यामध्ये थकीत कर्ज असलेले किंवा मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज असलेले शेतकरी या योजने अंतर्गत पात्र होत नाहीत. याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे शेतकरी असतील त्यांनाच ही योजना लागू होते.

बऱ्याच साऱ्या बँकांच्या माध्यमातून जे काही हे व्याज दरामध्ये दिली जाणारी सवलत आहे ती सवलत या ठिकाणी कपात केली जात नाही त्यांच व्याज घेतलं जात नाही परंतु बऱ्याच साऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसूली केली जाते आणि राज्यशासनाच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच व्याज परत दिलं जातं. ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील अशा शेतकऱ्यांना या अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची सवलतीची रक्कम आता ही त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल

महत्त्वपूर्ण असा जीआर आपण maharashtra.gov.in या संखेत स्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला ब्लॉग मध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो आता तुम्ही जर अल्पमुदत पीक

कर्जधारक शेतकरी असाल तुम्ही जर विहित मध्यमध्ये परत फेड केलेली असेल आणि जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये व्याज जर परत दिल जात नसेल तर तुम्ही याची तक्रार उपनिबंधक कार्यालयामध्ये करू शकता त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या कार्यालयामध्ये दिली जाईल तर अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट होता ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद

पात्रता निकष

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:
अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असणे आवश्यक
✔ कर्जाची परतफेड 30 जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक
❌ थकीत कर्जधारक पात्र नाहीत
❌ मध्यम किंवा दीर्घमुदत कर्ज घेतलेले शेतकरी पात्र नाहीत

सवलत मिळण्याची प्रक्रिया

  • काही बँका व्याज सवलत थेट बिलात कपात करतात.

  • काही बँका पूर्ण व्याज वसूल करून शासनाकडून मिळणारी सवलत नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात.

  • साधारणपणे सवलतीची रक्कम सप्टेंबर महिन्यात खात्यात जमा होते.

तक्रार प्रक्रिया

जर आपण पात्र असूनही व्याज सवलतीची रक्कम मिळाली नसेल तर:

  1. उपनिबंधक कार्यालय येथे तक्रार नोंदवा

  2. संबंधित कागदपत्रे (कर्ज खाते पासबुक, परतफेड पुरावा) सोबत द्या

  3. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – maharashtra.gov.in

  4. sarkari yojana – https://sarkariyojana.store/

2025-26 आर्थिक वर्षासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • एकूण तरतूद: ₹100 कोटी

  • पहिला टप्पा निधी मंजुरी: ₹60 कोटी (12 ऑगस्ट 2025)

  • सवलत दर: एकूण 7% पर्यंत (राज्य + केंद्र)

  • लागू कालावधी: अल्पमुदत पीक कर्ज (3 लाखांपर्यंत)

निष्कर्ष:

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना आहे. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होतो. 2025 मध्ये शासनाने पुन्हा एकदा निधी मंजूर केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात व्याज परतावा जमा होणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – हप्ता अपडेट व पात्रता तपासा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – हप्ता अपडेट व पात्रता तपासा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

ताज्या अपडेट्स

  • पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

  • या योजनेचा हप्ता 22 ऑगस्ट 2025 च्या आसपास वितरित होण्याची शक्यता आहे.

  • अधिकृत तारीख निधीचा जीआर आल्यानंतर जाहीर केली जाईल.

हप्ता ला का उशीर होतोय?

  • पीएम किसान योजनेत पात्र असलेले लाभार्थीच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतात.

  • पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यावर पात्र लाभार्थ्यांची यादी नमो शेतकरी योजनेसाठी तयार केली जाते.

  • त्यानंतर निधीची मागणी, जीआर मंजुरी आणि DBT द्वारे पेमेंट प्रक्रिया केली जाते.

पात्रता व हप्ता स्टेटस कसे तपासावे?

पात्रता व हप्ता स्टेटस कसे तपासावे?

A. नमो शेतकरी पोर्टलवरून तपासा

  1. नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.

  2. Beneficiary Status वर क्लिक करा.

  3. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर / आधार लिंक मोबाईल नंबर / आधार नंबर टाका.

  4. कॅप्चा कोड भरून Get Data वर क्लिक करा.

  5. येथे पाहू शकता:

    • तुम्ही पात्र आहात का?

    • अपात्र असल्यास कारण

    • मागील हप्त्यांची तारीख व स्टेटस

    • पेमेंट फेल असल्यास कारण

B. PFMS पोर्टलवरून FTO स्टेटस

  1. PFMS पोर्टल उघडा.

  2. योजना निवडताना नमो शेतकरी महासन्मान निधी DBT निवडा.

  3. रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाका.

  4. Get Data वर क्लिक करून FTO (Fund Transfer Order) ची स्थिती पाहा.

नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची या योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित केला जाऊ शकतो हप्ता वितरित होणार का? मला हप्ता येणार का किंवा मला जर येणारे हप्ते येत नसतील किंवा आलेला हप्ता आलेला नसेल तर तो का आलेला नाही हे कशा प्रकारे पाहायचं याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी विलंब झाला आणि तेवढाच मोठा विलंब आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा होतोय आणि याच पार्श्वती पीएम किसान योजना बंद झाली तसेच नमो शेतकरी योजना बंद झाली का अशा प्रकारचे प्रश्न देखील आता उठायला लागलेले आहेत परंतु मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर याच्यामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्याच्या आधारेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाला विसावा हप्ता वितरित केल्यानंतर याच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी ही पोर्टलच्या माध्यमातून नमो शेतकरीसाठी घेतली गेलेली आहे ही यादी घेतल्यानंतर किती लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले तर किती लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाऊ शकतो याची सर्व पाहणी केल्यानंतर कारण पीएम किसानचे जे लाभार्थी पात्र होतात

तेच नमो शेतकरीसाठी पात्र असतात मग याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी परत सरकारकडे केली जाते शासनाच्या माध्यमातून तो निधी मंजूर केला जातो आणि तो निधी वितरित केल्यानंतर पुढे लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याच वितरण केलं जातं या योजनेच्या हप्ता वितरणासाठी जो सातवा हप्ता येणार आहे हा वितरण करण्यासाठी याची यादी फायनल करण्यात आलेली आहे

जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहे अशा लाभार्थ्यासाठी निधीची मागणी देखील आता करण्यात आलेली याच्यासाठीचा एक जीआर निर्गमित करून या योजनेसाठीचा निधी मंजूर केला जाईल आणि हा निधी मंजूर करून वितरित करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर या योजनेचा हप्ता पुढे दोन तीन किंवा जी काही तारीख निश्चित केली जाईल त्या तारखेला वितरित केल जाईल आता तारीख काय निश्चित केले जाऊ शकते सध्या जे काही अपडेट समोर येत आहेत आणि सध्या ज्या प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हालचाली सुरू आहे

त्या अनुषंगाने 22 ऑगस्ट पर्यंत हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत परंतु या योजनेचा निधीचा जीआर अद्याप आलेला नाही तो निधीचा जीआर आल्यानंतर आणि निधी वितरित केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून याची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल आणि त्याच्याबद्दल आपण अपडेट देखील नक्की घेणार आहोत मित्रांनो हे सर्व होत असताना मी या योजने अंतर्गत पात्र आहे का ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं बरेच जण म्हणतात पीएम किसानच पोर्टल आहे नमो शेतकरीच काय नमो शेतकरी योजनेच सुद्धा पोर्टल आहे या पोर्टलची लिंक आपल्याला या ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे.

बेनिफिशरी स्टेटस वरती क्लिक करायच आहे. बेनिफिशरी स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुमचा आधार संलग्न मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून याच्यामधून माहिती पाहू शकता. याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून याच्या खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून तुमहाला ओटीपी मागवायचा आलेला ओटीपी एंटर करून गेट डाटा वरती क्लिक करायचे गेट डाटा वरती क्लिक केल्यानंतर तुमचं पीएम किसान रजिस्ट्रेशन कधी झाले

त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल तुम्ही पात्र आहात का दाखवल जाईल अपात्र असाल तर काय कारणासतो अपात्र आहे ते दाखवल जाईल याच्यापुढे तुम्हाला पीएफएमएस जे तुमचा लास्ट जनरेट झालेला आहे त्याचा स्टेटस दाखवली जाईल की तो कधी झाला होता तो फेल झाला तर बरेच जण म्हणतात की मला ला दुसरा हप्ता आला नाही तिसरा हप्ता आला नाही किंवा मला हफ्तेच आले नाहीत किंवा माझा एखादा हप्ता आलेला नाही तो बाद झाला वगैरे तर त्याच्यामध्ये तुमची स्टेटस या ठिकाणी पाहू शकता

आणि याच्याच खाली तुमचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हप्ता कधी आलेला आहे किती तारखेला आला ते पाहू शकता त्याच्यापुढे तुम्हाला लिंक नावाची एक ऑप्शन दिलेली आहे त्या लिंक वरती जर क्लिक कराल तर तुमचा तो लॉट कधी क्रिएट झाला होता तो तुमच्या बँकेत कधी क्रेडिट झाला आणि जर झालेला नसेल तर तो कोणत्या कारणास्तव तुमचं पेमेंट फेल झालय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता.

हे झालं नमो शेतकरीच्या पोर्टलवरती बेनिफिशरी च स्टेटस पाहण्याची माहिती ज्याच्यामध्ये तुम्ही अपात्र असाल तरी दाखवल जाईल पात्र असाल तरी दाखवल जाईल तुम्ही पात्र असून हप्ता जर आलेला नसेल तर तोही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला तुमचे एफटीओ च स्टेटस पाहायचे असेल जस आपण पीएम किसानचा एफटीओ जनरेट होतो तसच नमो शेतकरीचे सुद्धा एफटीओ जनरेट होतात कारण डीबीटीच्या माध्यमातून हे पेमेंट आहे. जर योजनेचा जीआर निधीचा आला त्याच्यानंतर एफटीओ जनरेट झाले तर तुमच्या पीएफएमए च्या पोर्टलला तुमचा एफटीओ दाखवला जाणार आहे.

पीएफएमए च्या पोर्टल वरती तुम्हाला ज्या ठिकाणी आपण पीएम किसान सिलेक्ट करतो त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या डीबीटी ची ऑप्शन देण्यात आलेली आहे. ही ऑप्शन सिलेक्ट करायची आहे तुमचा जो काही बेनिफिशरी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तो खालचा कॅप्चा कोड टाकायचा आणि गेट डाटा वरती क्लिक करायच तुमच्या एफटीओ ची स्थिती दाखवली जाईल.

पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि आता सातवा जनरेट झाल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये वरती तुम्हाला दाखवला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात का हे तपासू शकता तुमचा हप्ता कधी येणार आहे त्याची माहिती त्याठिकाणी पाहू शकता येणार आहे का पाहू शकता आलेला नसेल तर तेही पाहू शकता आणि हा हप्ता साधारणपणे 22 ऑगस्टच्या आसपास वितरित केला जाऊ शकतो

अशा शक्यता आता समोर आल्या कन्फर्म अशी डेट आणि कन्फर्म असा अपडेट याचा जीआर आल्यानंतर आणि याच्याबद्दल अपडेट दिल्यानंतर देखील नक्की घेऊयात तर अशा प्रकारचे काही महत्वाचे प्रश्न आणि महत्त्वाची माहिती होती जे आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद

महत्त्वाच्या लिंक

निष्कर्ष

सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 22 ऑगस्टच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. निधीचा जीआर आल्यानंतर अधिकृत तारीख घोषित केली जाईल. तोपर्यंत वरील पद्धतीने तुम्ही तुमची पात्रता आणि हप्ता स्टेटस सहज तपासू शकता.

ई-पीक पाहणी 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती!

ई-पीक पाहणी 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती!

🙏 नमस्कार शेतकरी बांधवांनो,

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असा ई-पीक पाहणी 2025 प्रकल्प खरीप हंगामासाठी सुरू झाला आहे!

मुदत: 1 ऑगस्ट 2025 ते 15 सप्टेंबर 2025

या काळात आपण आपल्या शेताच्या सातबाऱ्यावर असणाऱ्या खरीप हंगामातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अ‍ॅप किंवा पोर्टलद्वारे करू शकता.

कशी कराल ई-पीक पाहणी?

  • आपल्या मोबाईलमधून ‘ईपीक पाहणी’ अ‍ॅप डाउनलोड करा.

  • किंवा जवळच्या सेतू केंद्र, मित्र, कृषी सहाय्यक यांच्याकडून मदत घ्या.

  • शेवटची मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे, त्यामुळे वेळेत नोंदणी पूर्ण करा.

  • sarkariyojana.store

  • E PIk Phani aap Link  https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en-US

ई-पीक पाहणी 2025 संदर्भातील महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंदवण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे इपीक पाहणी मित्रांनो ईपीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामा करता राज्यातील शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी ईपीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

या मुदतीच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु 1 ऑगस्ट पासून सुरू होणारे प्लिकेशन काही तांत्रिक कारणास्तव सुरु करण्यात आलेलं नव्हतं याच्यामध्ये शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्यासाठी लॉगिन करता येत नव्हतं.

याच्याच मध्ये आता हे प्लिकेशन अपडेट करण्यात आलेल आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना आता ईपीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामातील आपल्या निर्भेळ पिकासाठी आपल्या कायम पडीसाठी आपल्या जे काही तात्पुरती पड असेल विहीर असतील बोर असतील याची ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे एपी पाहणे कारण शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे लाभ असतील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई असेल किंवा भावांतर योजना असेल अशा सर्व योजनांचे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ईपीक पाहणी होणं अतिशय गरजेचं असतं आणि याच्याच अंतर्गत आता खरीप हंगाम 2025 करता ही ईपीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे.

प्लिकेशन नवीन आहे अपडेट झालेल प्लिकेशन आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि लोड जास्त असल्यामुळे साहजिकच याच्यामध्ये काही आता तांत्रिक बिगाड सुद्धा वेळोवेळी येणार आहे इथ ईपीक पाहणीची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर 2025 आहे.

ईपीक पाहणी जशी जशी हळूहळू सुरळित होईल तशी तशी आपली ईपीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो ईपीक पाहणी ही अतिशय महत्त्वाची आहे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत करून घ्या. याच्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांची इपीक पाहणी बाकी राहील त्यांची इपीक पाहणी ही जे काही इपीक पाहणी सहाय्यक असतील त्यांच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे परंतु ईपीक पाहणी आपली सहायकाच्या माध्यमातून करून घेण्याचा वाट पाहू नका आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या जवळच्या मित्रांच्या माध्यमातून इतर काही जे पीक पाहणी करून देत असतील त्यांच्या माध्यमातून आपल्या पिकांची ताबडतोप पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद

ईपीक पाहणी 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

ईपीक पाहणी 2025 साठी 1 ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळ दिली आहे.

ईपीक पाहणी ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर घेतलेल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सरकारी प्रणाली आहे. यामध्ये सातबाऱ्यावर पिकांची माहिती भरली जाते.

पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान, भावांतर योजना, व शेतकऱ्यांसाठी असलेल्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ईपीक पाहणी अनिवार्य आहे.

  • मोबाईलमधून ‘ईपीक पाहणी’ अ‍ॅप डाउनलोड करा.

  • त्यामध्ये लॉगिन करून सातबाऱ्याची व पीक माहिती भरा.

  • किंवा जवळच्या सेतू केंद्र, मित्र, किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून करवून घ्या.

जर पीक पाहणी केली नाही, तर शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही – जसे की पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान इत्यादी.

1 ऑगस्ट रोजी अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, पण आता अ‍ॅप अपडेट करण्यात आले आहे. तरीही लोड जास्त असल्यास थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा.

15 सप्टेंबर 2025 नंतर ईपीक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून करण्यात येईल. पण स्वतः करून घेणं फायदेशीर ठरेल.

  • शेताचा सातबारा

  • पीकाचे नाव

  • क्षेत्रफळ

  • पाणी स्रोत (विहीर/बोर/कायम पड/तात्पुरता पड)

💬 तुमच्या परिसरातील शेतकरी मित्रांनाही ही माहिती जरूर शेअर करा. आपली पीक पाहणी वेळेत करा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या! धन्यवाद! 🙏🌱

फार्मर आयडी असला की शेती योजनांसाठी आता कुठलीही कागदपत्रं नकोत – राज्य शासनाचा मोठा निर्णय!

फार्मर आयडी असला की शेती योजनांसाठी आता कुठलीही कागदपत्रं नकोत – राज्य शासनाचा मोठा निर्णय!

नमस्कार शेतकरी बांधवांनो!

शेतकऱ्यांच्या कामकाजात अधिक सुलभता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यांना कोणतीही कृषी योजना अर्ज करताना फार्मर आयडी असल्यास, सातबारा, आठ उतारा किंवा इतर कागदपत्रं पुन्हा-पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

काय आहे निर्णयाचे सार?

राज्य शासनाच्या कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करत सूचित केलं आहे की, फार्मर आयडी असलेला शेतकरी योजनेसाठी पात्र असेल आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिक कागदपत्रांची मागणी करणे आवश्यक नाही.

फार्मर आयडी हे एक असे डिजिटल ओळखपत्र आहे जे:

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी योगाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी वरणांचा लाभ घेत असताना फक्त फार्मर आयडी असणं गरजेच आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची गरज लागणार नाही.

राज्यामध्ये केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना महाडीबीडी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. मित्रांनो योजनेच्या अंतर्गत प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिल जात आहे आणि अशा तत्वावरती या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

योजनाची अंमलबजावणी केली जात असताना ज्या शेतकऱ्यांची निवड या योजनेच्या अंतर्गत केली जाईल त्या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितल जात आणि या कागदपत्रामध्ये प्रत्येक वेळी मागितल जाणारं महत्त्वाचं अस कागदपत्र म्हणजे शेतीचा सातबारा आणि आठ  ही बंधनकारक कागदपत्र याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहेत बऱ्याच वेळा याच्यामध्ये सातबारा स्पष्ट असणं किंवा इतर काही त्याच्यामध्ये चुका काढणं आणि अशा चुकास्तव हे कागदपत्र परत एकदा लाभार्थ्यांकडे परत पाठवणं त्या लाभार्थ्याला पूर्वसंमत्या देण्यापासून रोखणं किंवा या सर्व कागदपत्रामुळे लाभार्थ्याला लाभ मिळण्यामध्ये दिरंगाई होणं अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत

आणि याच अनुषंगाने कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार कृषी संचालकाच्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेल आहे ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आयडी दिलेला आहे अशा फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र हे कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी मागणी करू नयेत अशा प्रकारच्या सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत

एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आता फार्मर आयडी नुसारच योजनेचा अर्ज करता येतो लाभ घेता येतो आणि अशाप्रकारे आता फार्मर आयडीच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर लाभ घेत असताना किंवा लाभ घेत असताना फार्मर आयडी दिल्यानंतर पुन्हा कागदपत्राची मागणी करू नये कारण फार्मर आयडी हा इंटिग्रेटेड पोर्टलच्या माध्यमातून बनवला जात आहे

याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती जोडल्यानंतरच त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी जनरेट होतो त्याच्यामुळे फार्मर आयडी असल्यानंतर ही अनावश्यक असलेली कागदपत्र मागू नये अशा प्रकारच्या सूचना या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि अशाच प्रकारच हे प्रसिद्धी पत्रक सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आलेल आहे

जेणेकरून आता कुठल्याही प्रकारच्या डेस्टला असलेला अर्ज हा या सातबारा आठ अशा कागदपत्रासाठी परत पाठवला जाणार नाही.

अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा निर्णय ज्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये खर्च देखील वाचणार आहे.

काय अडचणी होत्या आधी?

पूर्वी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर योजना अर्ज करताना सातबारा, आठ उतारा, बँक पासबुक इत्यादी अनेक कागदपत्रं पुन्हा-पुन्हा अपलोड करावी लागत होती.
या प्रक्रियेमध्ये:

  • कागदपत्रं अपलोड करताना चुका होत,

  • सातबारा अस्पष्ट असल्यामुळे अर्ज रिजेक्ट होत,

  • अर्जाची प्रक्रीया उशिराने होत,

  • काही वेळेस शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब लागत होता.

  • https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/

  • sarkariyojana.store

🤝 शेवटी काही शब्द…

हा निर्णय खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. फार्मर आयडीच्या माध्यमातून आता योजनांचा लाभ अधिक सहजतेने, पारदर्शकतेने आणि वेळेत मिळू शकतो. हे पाऊल डिजिटल कृषी व्यवस्थेकडे वाटचाल दर्शवते आणि भविष्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच क्रांतिकारी ठरणार आहे.

धन्यवाद 🙏 जय जवान, जय किसान!