मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन – पण शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी 2025?

मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन – पण शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी?

पण शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी?

नमस्कार मित्रांनो काल अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा एक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलेल्या भाषणामध्ये अगदी दोन ते पाच सेकंदामध्ये आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा आश्वासन पाळणार लवकरच ते पूर्ण करणार अशा संदर्भातील एक वक्तव्य करण्यात आलं आणि मित्रांनो या वक्तव्याची एक बातमी झाली

आणि राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आशा दिसू लागल्या याचाच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केले गेले की खरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का कारण आपण जर पाहिलं तर मीडिया न्यूज चॅनल जे काही YouTube चॅनल असतील किंवा वर्तमान पत्र असतील याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी बातमी छापण्यात आली की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन पूर्ण करणार आता ही कर्जमाफी कधी होणार कर्ज भरावी का कर्ज भरू नयेत का अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात पुन्हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

म आपण नाशिकचे उदाहरण पाहिलं होत नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सामोपचार जे काही परतफेड योजना आणण्यात आलेली होती त्याच्यामध्ये व्याजाची जी काही टक्केवारी ती कमी करण्यात आलेली होती वगैरे वगैरे परंतु त्याच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाठ फिरवण्यात आली होती अगदी त्या बँकेचा परवाना रद्द होतोय काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आणि राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये बँकांच्या याच परिस्थिती आहेत म अशा बँकांना वाचवण्यासाठी कर्जमाफी तर अतिशय आवश्यकच आहे परंतु शेतकरी जे गेल्या चार ते पाच वर्षापासून या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपपतेळ बाधित आहेत

त्यांना सुद्धा वाचवण्यासाठी कर्जमाफी अतिशय आवश्यक आहे परंतु मित्रांनो आपण पाहिलं होत याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता या अनुषंगाने एक समिती घटित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि या समितीच्या माध्यम या समितीच्या बद्दलचे जी काही माहिती असेल उद्गार असतील ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेले होते परंतु ती बातमी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आणि फिरून तेच वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केले असं सांगण्यात आल्यामुळे ळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची याठिकाणी दिशा भूल होते काय अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झालेली

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की पाच वर्षांमध्ये दोन वेळा कर्जमाफी देऊन सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती कुठेही बदललेली नाही त्याच्यामुळे कर्जमाफी हा या शेतकऱ्यांच्या जी काही दुरावस्था झाली आहे याच्यासाठीचा पर्याय नाही त्याच्यामुळे राज्यशासनाच्या माध्यमातून एक समिती घटित करण्यात आलेली आहे ज्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा इतर कुठल्या मार्गाने त्यांचा स्वायत करता येत का त्यांना सबलता करता येते मानता येते का हे पाहण्यासाठी ती समिती अभ्यास करणार आहे

अर्थात ही समिती कर्जमाफी देण्यासाठी अभ्यास करणार नाही या समितीच्या माध्यमातून जो अभ्यास केला जाणार जस की आता त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक वर्षी पा हजार कोटी रुपये पुढील पाच वर्षात 25 हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक हे सरकार या ठिकाणी करणार आहे म्हणजे कर्जमाफी करून तात्पुरत एक काहीतरी दिलासा देण्यापेक्षा लॉंग टाईम कशाप्रकारे शेतकऱ्यांना सपोर्ट करता येईल हा आमच्या माध्यमातून पाहण्यात येत आहे

अशा प्रकारचे उद्गार त्यांच्या माध्यमातून काढण्यात आले त्याच्यामुळे आम्ही लवकरच कर्जमाफी करणार शेतकऱ्याची कर्जमाफी होणार अशा प्रकारची कुठली आशा त्यातून दिसून आलेली नाही आता भोळे बाबडे शेतकरी कर्जमाफी होणार किंवा पूर्ण करणार म्हणलं तरी एक अपेक्षा निर्माण होतात परंतु सध्या तरी कुठल्यातरी मोठ्या निवडणुका येईपर्यंत म्हणा किंवा कुठल्यातरी मोठ्या प्रमाणात प्रेशर निर्माण होईपर्यंत म्हणा कुठल्याही प्रकारे कर्जमाफीची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही आता राहिला विषय या समितीचा आता ती समिती लवकरच अभ्यास करेल त्या समितीचा अहवाल येईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर जर समितीने सांगितलं की नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हीच प्रयरिटी आहे

कर्जमाफी केल्याशिवाय दुसर गत्यांतर नाही तर मग मात्र कर्जमाफी केली जाऊ शकते परंतु आता या समितीचा अभ्यास होणं समितीचा अहवाल येणं आणि या सगळ्या गोष्टी आणखीन बाकी आहेत त्याच्यामुळे जरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं तरी त्यांना पुढील पाच वर्ष जोपर्यंत निवडणुका येत नाही तोपर्यंत हेच वक्तव्य कराव लागणार कारण त्यांनी दिलेल आश्वासन आहे आम्ही आश्वासन पूर्ण नाही करणार म्हणणार तरी रोष निर्माण होऊ शकतो त्याच्या त्याच्यामुळे ते आश्वासनापासून पडूही शकत नाहीत.

आश्वासन देणार आम्ही आश्वासन पूर्ण करणार हे त्यांना सांगत राहावं लागणार आहे आणि तशाच प्रकारे त्यांनी काल सुद्धा सांगितलेल आहे. त्याच्यामुळे कर्जमाफी होणार किंवा लगेच होणार अशा प्रकारच्या कुठल्याही भोळ्या बाबड्या आशावरती शेतकऱ्यांनी राहू नये. 

1 ) sarkariyojan.store

2 ) prabhudeva 

धन्यवाद.

निष्कर्ष:

“कर्जमाफी होणार” या शब्दांमागे शेतकऱ्यांनी अंध विश्वास न ठेवता वास्तव परिस्थितीचा विचार करावा.
कर्जमाफी ही शाश्वत उपाययोजना नाही, हे मुख्यमंत्र्यांनीच मान्य केलं आहे.
पुढील निर्णय समितीच्या अहवालावर अवलंबून आहे.

शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे प्रश्न

अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी अभ्यास करून शिफारसी करणार आहे.

यासंबंधी नवीन निकष काय असतील हे समितीच्या अहवालावर अवलंबून असेल. सध्या तरी पूर्वीच्या कर्जमाफी योजनांचे नियमच लागू आहेत.

ही समिती शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी शाश्वत आर्थिक मदतीचे मार्ग काय असू शकतात, हे पाहणार आहे. म्हणजेच, सबलीकरणाचे पर्याय शोधणार.

सध्या सरकारकडून कोणतीही कर्जमाफी लागू झालेली नाही. त्यामुळे परतफेड थांबवणं हे बँक पातळीवर अडचणीत आणू शकतं. अधिकृत निर्णय येईपर्यंत नियमित व्यवहार करणं शहाणपणाचं ठरेल.

सरकार दरवर्षी 5000 कोटी गुंतवणूक करून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवण्याची तयारी करत आहे – ज्यात सिंचन, उत्पादन, बाजार व्यवस्थापन यावर भर असेल.

यासंदर्भात सरकारकडून कोणतीही निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. पुढील अधिवेशनात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अधिकृत सरकार पोर्टल, कृषी विभागाचं संकेतस्थळ, व स्थानिक शासकीय कार्यालयामार्फत किंवा विश्वासार्ह न्यूज पोर्टलवर.