KYC बाबत फेक कॉल्स, व्हायरल यादी
नमस्कार मित्रांनो,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून राज्यातील लाखो महिलांना याचा लाभ मिळत आहे. परंतु अलीकडेच योजनेच्या नावावरून काही चुकीच्या माहितीचा प्रसार होत आहे. यामध्ये KYC संदर्भातील फेक कॉल्स, खोटी लिंक्स आणि लाभार्थ्यांची खासगी माहिती व्हायरल होणे यासारख्या गंभीर घटना समोर येत आहेत.
नमस्कार मित्रांनो
मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची केवायसी आणि या योजनेच्या अंतर्गत अपात्र
झालेल्या लाभार्थ्यांची यादी याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार
आहोत.
राज्य शासनाचे
अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकीबाईन योजना.
साहजिकच लाखो लाभार्थी याच्या अंतर्गत लाभ घेत आहेत पडताळण्या सुरू आहेत
त्याच्याबद्दल नवनवीन अपडेट हे सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत परंतु सोबतच
काही याच्या अंतर्गत आपवा पेरल्या जातात.
काही याच्या
अंतर्गत नवनवीन कृपत्या सांगितल्या जातात आणि लाभार्थ्यांना प्रत्येक वेळी काही ना
काही याच्यामध्ये दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातात मित्रांनो मोठी योजना आहे
आणि प्रत्येक योजना जर आपण पाहिलं ज्या मोठ्या योजना आहेत किंवा ज्याच्या अंतर्गत
लाभार्थी लाभ घेतात अशा योजनांमध्ये री केवायसी बँकेचे अकाउंट असतील असतील गॅसचे
कनेक्शन असतील किंवा आपण पाहिले पीएम किसान असेल अशा वेगवेगळ्या योजनांमध्ये
वेळोवेळी केवायसी करून घेतली जाते
रेशन कार्ड मध्ये
केवायसी करून घेतली जाते आता ही नवीन योजना एक वर्ष झालं जशी जशी योजना पुढे जाईल
तशीयाच्यामध्ये सुद्धा केवायसी करण्याची गरज असणार आहे परंतु सध्या तरी
राज्यशासनाच्या माध्यमातून याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची केवायसी सुरू केलेली
नाही.
जर सुरू केली तर
त्याच्या संदर्भातील अधिकृत असा जीआर अपडेट नोटिफिकेशन परिपत्रक जे काही आहे ते
काढल जाईल आणि पुढे त्याच्याबद्दलच अवेरनेस दिल जाईल सध्या तरी याच्या अंतर्गत
केवायसी सुरू नाही परंतु या केवायसी च्या नावावरती अनेक साऱ्या फेक लिंक बनवल्या
जात आहे अनेक साऱ्या महिला लाभार्थ्यांना कॉल केले जात आहे त्यांची पर्सनल माहिती
विचारली जात आहे तुम्ही कुठे राहता तुम्ही काय करता
तुमचे पती काय
करता तुमचं वय किती सगळ्या गोष्टी सगळ्या बाबी या ठिकाणी जाणून घेतल्या जातात याचा
अर्थ याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो मित्रांनो याचबरोबर राज्यशासनाच्या माध्यमातून
सांगितलं जात की लाखो लाभार्थी हे पडताळणीच्या यादीमध्ये आहेत अद्याप ही अपात्र
केलेले लाभार्थ्याबद्दल कुठली माहिती दिली जात नाही फक्त याच्यामध्ये चुकीच्या
पद्धतीने लाभ घेणारे शासकीय कर्मचारी असतील किंवा इतर काही लोक असतील ते अपात्र करण्यात
आलेलेत बाकी लाभार्थ्याची याच्या अंतर्गत पडताळणी सुरू आहे
आता ही पडताळणी
सुरू असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जवळजवळ 180079
पानाची यादी वायरल केली जात आहे ज्याच्यामध्ये
महिलाच नाव गाव आधार नंबर मास केलेला मोबाईल नंबर आणि अपात्र आहे म्हणून त्याच्यामध्ये
दाखवण्यात आलेले आता ही यादी पसरत असताना त्याच्यामध्ये महिलेच नाव आणि महिलेचा
मोबाईल नंबर आणि गावाच नाव दिल गेलेले आता याच्यामधील महिलाच्या मोबाईल नंबर वरती
जर काही माते फिरवणच्या माध्यमातून कॉल केले गेले त्यांची पर्सनल माहिती विचारली
गेली किंवा काही महिलांना त्रास दिला गेला तर याला जिम्मेदार कोण असणार आहे
अशा प्रकारची
यादी शासनाच्या माध्यमातून तरी काढली जाऊ शकत नाही आणि अशी जर यादी जर मोबाईल नंबर सह काढली गेली असेल तर माग मात्र या लाडक्या बहीण योजनेच्या
अंतर्गत लाडकी बहीण म्हणण्याचा महिलेला सुद्धा या ठिकाणी शासनाला कुठला अधिकार
नाही कारण एखाद्या महिलेची गोपनीय माहिती सरकार अशा प्रकारे प्रसिद्ध करू शकत नाही
आणि जर ती प्रसिद्ध केली असेल तर ती बाहेर दिली कशी गेली आणि दिली गेली असेल तर ती
व्हायरल का केली जात व्हायरल केली जात असेल तर महिलांच्याशी गोपनीय माहिती व्हायरल
करणाऱ्यावरती काय कारवाई केली जाईल हे देखील या ठिकाणी प्रश्न असणार आहे
बऱ्याच साऱ्या
महिला लाभार्थ्यांना ज्या याच्या अंतर्गत पात्र आहेत अशा महिला लाभार्थ्यांना
देखील आता कॉल यायला सुरू झालेले आहे ज्या महिला लाभार्थी पडताळणीमध्ये आहेत
त्यांना देखील कॉल यायला सुरू झालेलेत आणि अशा प्रकारे जर महिलांची गोपनीय माहिती
जर बाहेर दिली तर त्या महिलांना कॉल करून त्यांचे अकाउंट नंबर विचारला जात त्यांचा
गाव विचारला जात आहे सगळी त्यांची गोपनीय माहिती विचारली जाते आणि अशा प्रकारे जर
महिलांसोबत जर हा जर खेळ खेळला जात असेल तर याची जिम्मेदारी ही नक्कीच सरकारला
महिला व बाल विकास विभागाला घ्यावी लागणार आहे.
त्याच्यामुळे अशी
यादी प्रकाशित केली आहे का? याच्याबद्दलच स्पष्टीकरण देणं गरजेच आहे आणि
सध्या या केवायसी बद्दलच्या ज्या काही अपवा पसरवल्या जात आहे ती केवायसी करायची
आहे का कधी करायची आहे किंवा कधी पुढे भविष्यात केली जाईल याच्याबद्दलच देखील
स्पष्टीकरण आता सरकारच्या माध्यमातून देणं गरजेच आहे महिला बालविकास विभागाच्या
माध्यमातून देणं गरजेच आहे तर अशा प्रकारच्या कुठल्याही याद्या कृपया कोणी व्हायरल
करू नये आणि जर असे काही केवायसी च्या संदर्भात किंवा इतर जर काही कॉल आले तर
त्याची रितसर तक्रार महिलांच्या माध्यमातून दाखल करावी
धन्यवाद
KYC संदर्भात सध्याची स्थिती
-
सध्या राज्य शासनाने या योजनेअंतर्गत कोणतीही KYC प्रक्रिया सुरु केलेली नाही.
-
जर भविष्यात KYC सुरू करण्यात आली, तर त्यासंबंधित अधिकृत GR, नोटिफिकेशन किंवा परिपत्रक शासनाद्वारे जाहीर केले जाईल.
-
त्यामुळे नागरिकांनी फेक कॉल्स व लिंक्सपासून सावध राहावे.
फेक कॉल्स आणि गोपनीय माहितीचा गैरवापर
अनेक महिलांना फोनवरून त्यांच्या नाव, वय, पतीचं नाव, मोबाईल नंबर, बँक डिटेल्स विचारले जात आहेत.
काही केसेसमध्ये महिलांना धमकावणे, माहिती मागणे किंवा OTP विचारणे असे प्रकारही समोर आले आहेत.
हे सर्व प्रकार फसवणूक करण्याच्या उद्देशाने होत असून त्याविरोधात तात्काळ तक्रार दाखल करणं आवश्यक आहे.
सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून अपेक्षित स्पष्टता
सरकारने लवकरात लवकर स्पष्ट करावं की –
सध्या KYC सुरू आहे का?
ती केव्हा सुरू होणार?
अपात्र लाभार्थ्यांची माहिती अधिकृत आहे का?
महिलांची खासगी माहिती लीक होण्यामागे कोण जबाबदार आहे?
निष्कर्ष
लाडकी बहिण योजना” महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. पण जर याच योजनेच्या नावावर महिलांची फसवणूक केली जात असेल तर शासनाने तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे. महिलांनी देखील स्वतःच्या सुरक्षेसाठी सावध राहणं, जागरूक राहणं आणि गरज असल्यास तक्रार करणं आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना – KYC FAQs
सध्या या योजनेअंतर्गत शासनाकडून कोणतीही KYC प्रक्रिया सुरू केलेली नाही. भविष्यात सुरू झाल्यास अधिकृत परिपत्रक जाहीर केले जाईल.
नाही. सध्या आलेले KYC संदर्भातील कॉल्स, फेक लिंक्स हे फसवणुकीसाठी असतात. यावर विश्वास ठेवू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
नाव, पतीचे नाव, वय, गाव, बँक अकाउंट नंबर, आधार क्रमांक, OTP अशी गोपनीय माहिती विचारली जाते. ही माहिती देणे टाळा.
सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेली यादी शासनाकडून अधिकृतरीत्या घोषित केलेली नाही. महिलांची गोपनीय माहिती यामध्ये असल्याने याविषयी चौकशी व स्पष्टीकरण आवश्यक आहे.