परिचय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक महिलांना नियमित हप्ते मिळत होते. मात्र अलीकडे काही महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. यामागे पात्रतेचे नवे निकष लागू करण्यात आले आहेत. या योजनेचा उद्देश खर्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा आहे.
सरकारी नोकरीत असलेल्या महिला, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला, चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला, तसेच निराधार योजनेमधून आधीच 1500 रुपये मानधन घेणाऱ्या महिलांना यामधून अपात्र ठरवण्यात येत आहे. तसेच आधार डेटावर आधारित मानधन मिळणाऱ्या इतर योजनांच्या माहितीच्या आधारे ही पात्रता तपासली जात आहे.
जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही अपात्र आहात का हे तपासणे गरजेचे आहे. पात्र असूनही हप्ता मिळत नसेल तर जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा. या लेखातून योजनेतील बदल आणि त्याचा थेट परिणाम समजून घेता येईल.
1500 रुपये मानधन पेक्षा जास्त मानधन
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत आतापर्यंत हप्ते येत असलेल्या परंतु योजनेच्या निकाशामध्ये नियमामध्ये पात्रतेच्या निकाशामध्ये बसत नसलेले जे काही महिला लाभार्थी आहेत यांचे येणारे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत
याच्यामध्ये जून महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिला लाभार्थ्यांना आपला जून जुलैचा हप्ता एकत्रित येणार का किंवा जुलै महिन्याचा हप्ता येणार का असे अनेक सारे प्रश्न पडलेले आहेत परंतु या योजनेच्या निकाशामध्ये आपण पात्र आहात का आपण अपात्र म्हणून येतो हप्ता तर बंद झाला नाही ना ही माहिती सुद्धा या ठिकाणी असणं गरजेच आहे
याच्यामध्ये यापूर्वीच विभागाच्या माध्यमातून नऊ तांत्रिक बाबी समजून सांगण्यात आलेल्या होत्या की याच्या अंतर्गत जे काही पात्रतेचे निकष ठेवण्यात आलेले आहेत याच्या बाहेरील जे काही महिला लाभार्थी आहेत त्यांचे हप्ते बंद करण्यात येत आहेत याच्यामध्ये आपण पाहिलं होत की बऱ्याच साऱ्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांच्या माध्यमातून या योजनेमध्ये अर्ज करण्यात आलेले होते
आणि अशा महिला लाभार्थी आता आधार बेस ही सर्व योजना राबवली जात असल्यामुळे त्याच्यामध्ये दिसून येत आहे ज्या महिलांच्या आधारवरती आता याठिकाणी इतर वेतन मानधन येत आहेत अशा महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र केल्या जात आहेत
याचबरोबर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी या निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना 1500 रुपये मानधन येत असल्यामुळे या योजनेच्या निकषानुसार त्या महिला लाभार्थी या योजनेच्या मानधनासाठी पात्र होत नाही कारण 1500 रुप पेक्षा कमी जर मानधन मिळत असेल तर उर्वरित मानधन या योजनेच्या अंतर्गत देण्याची तरतूद आहे
परंतु इतर योजनाच्या अंतर्गत 1500 रुप पेक्षा जास्त अनुदान मानधन येत असेल तरत्या महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र होत नाही आणि पर्यायान निराधार योजनेच्या महिला लाभार्थी ज्या असतील त्या लाभार्थी सुद्धा या हप्त्यापासून आता वंचित राहत आहेत त्यांचा हप्ता बंद करण्यात येत आहे.
यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होत की पोर्टलवरती लॉगिन केल्यानंतर जर तुम्ही निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते दाखवलं जाणार आहे आणि अशाप्रकारे ज्या महिलांना निराधार योजनेचे लाभार्थी आहेत म्हणून दाखवलं जाईल त्या महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत हप्त्याचं वितरण बंद करण्यात येत आहे.
आपण जर समजा मोबाईल प्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज केला असेल आपल्याला जर पोर्टलवरती माहिती दाखवली जात नसेल तर मात्र आपण जवळच्या कार्यालयामध्ये महिला बालविकास विभागाकडे संपर्क करून याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता.
याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेल की या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपयापर्यंतची उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली होती. बऱ्याच साऱ्या महिला हे काही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल वगैरे करतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही रिटर्न आहे तो दाखवला जातो किंवा काही इन्कम टॅक्स पे दाखवल्या जातात आहेत अशा ज्या काही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला आहेत ज्यांची कुठेतरी कार्यालयी नोंद आहे अशा महिला लाभार्थी देखील याच्यामधून हप्त्यासाठी अपात्र करण्यात येत आहे
चारचाकी वाहनाची चौकशी केली जात आहे बऱ्याच ठिकाणी ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावरती चार चाकी वाहन दिसून येत आहे चौकशीमध्ये तशा प्रकारचे निदर्शनास आलेले अशा महिला लाभार्थ्यांचे देखील याच्यामध्ये हप्ते बंद करण्यात आलेले आहेत. पीएम किसान नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो 500 रुपया पेक्षा कमी येत असल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांना मात्र उर्वरित हप्ता दिला जात आहे
याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरीच काही छोटी मोठी कारण आहेत जी या ठिकाणी या योजनेचा हप्ता मिळण्यापासून लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहेत आणि याच्यामुळे तुमचा जूनचा हप्ता आलेला नसू शकतो आणि जर या कारणांमध्ये तुम्ही जर असाल अपात्रमध्ये अपात्रतेमध्ये जर बसत असाल तर या कारणामुळे हप्ता बंद झाला असेल असं समजू शकता परंतु जर कुठल्याही कारणांमध्ये आपण जर बसत नसाल आणि आपला जर हप्ता आलेला नसेल तर मात्र महिला व बालविकास विभागाकडे आपण संपर्क करू शकता आणि याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता
जेणेकरून आपण जर पात्र असाल तरहप्ते सुरळित राहतील आणि आपण जर या योजनेच्या निकाशामध्ये नियमामध्ये बसत नसाल तर मात्र आपले हफ्ते बंद होतील
धन्यवाद