नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
ताज्या अपडेट्स
पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
या योजनेचा हप्ता 22 ऑगस्ट 2025 च्या आसपास वितरित होण्याची शक्यता आहे.
अधिकृत तारीख निधीचा जीआर आल्यानंतर जाहीर केली जाईल.
हप्ता ला का उशीर होतोय?
पीएम किसान योजनेत पात्र असलेले लाभार्थीच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतात.
पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यावर पात्र लाभार्थ्यांची यादी नमो शेतकरी योजनेसाठी तयार केली जाते.
त्यानंतर निधीची मागणी, जीआर मंजुरी आणि DBT द्वारे पेमेंट प्रक्रिया केली जाते.

पात्रता व हप्ता स्टेटस कसे तपासावे?
A. नमो शेतकरी पोर्टलवरून तपासा
नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
Beneficiary Status वर क्लिक करा.
तुमचा रजिस्ट्रेशन नंबर / आधार लिंक मोबाईल नंबर / आधार नंबर टाका.
कॅप्चा कोड भरून Get Data वर क्लिक करा.
येथे पाहू शकता:
तुम्ही पात्र आहात का?
अपात्र असल्यास कारण
मागील हप्त्यांची तारीख व स्टेटस
पेमेंट फेल असल्यास कारण
B. PFMS पोर्टलवरून FTO स्टेटस
PFMS पोर्टल उघडा.
योजना निवडताना नमो शेतकरी महासन्मान निधी DBT निवडा.
रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाका.
Get Data वर क्लिक करून FTO (Fund Transfer Order) ची स्थिती पाहा.
नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची या योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित केला जाऊ शकतो हप्ता वितरित होणार का? मला हप्ता येणार का किंवा मला जर येणारे हप्ते येत नसतील किंवा आलेला हप्ता आलेला नसेल तर तो का आलेला नाही हे कशा प्रकारे पाहायचं याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी विलंब झाला आणि तेवढाच मोठा विलंब आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा होतोय आणि याच पार्श्वती पीएम किसान योजना बंद झाली तसेच नमो शेतकरी योजना बंद झाली का अशा प्रकारचे प्रश्न देखील आता उठायला लागलेले आहेत परंतु मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर याच्यामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्याच्या आधारेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाला विसावा हप्ता वितरित केल्यानंतर याच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी ही पोर्टलच्या माध्यमातून नमो शेतकरीसाठी घेतली गेलेली आहे ही यादी घेतल्यानंतर किती लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले तर किती लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाऊ शकतो याची सर्व पाहणी केल्यानंतर कारण पीएम किसानचे जे लाभार्थी पात्र होतात
तेच नमो शेतकरीसाठी पात्र असतात मग याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी परत सरकारकडे केली जाते शासनाच्या माध्यमातून तो निधी मंजूर केला जातो आणि तो निधी वितरित केल्यानंतर पुढे लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याच वितरण केलं जातं या योजनेच्या हप्ता वितरणासाठी जो सातवा हप्ता येणार आहे हा वितरण करण्यासाठी याची यादी फायनल करण्यात आलेली आहे
जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहे अशा लाभार्थ्यासाठी निधीची मागणी देखील आता करण्यात आलेली याच्यासाठीचा एक जीआर निर्गमित करून या योजनेसाठीचा निधी मंजूर केला जाईल आणि हा निधी मंजूर करून वितरित करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर या योजनेचा हप्ता पुढे दोन तीन किंवा जी काही तारीख निश्चित केली जाईल त्या तारखेला वितरित केल जाईल आता तारीख काय निश्चित केले जाऊ शकते सध्या जे काही अपडेट समोर येत आहेत आणि सध्या ज्या प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हालचाली सुरू आहे
त्या अनुषंगाने 22 ऑगस्ट पर्यंत हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत परंतु या योजनेचा निधीचा जीआर अद्याप आलेला नाही तो निधीचा जीआर आल्यानंतर आणि निधी वितरित केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून याची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल आणि त्याच्याबद्दल आपण अपडेट देखील नक्की घेणार आहोत मित्रांनो हे सर्व होत असताना मी या योजने अंतर्गत पात्र आहे का ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं बरेच जण म्हणतात पीएम किसानच पोर्टल आहे नमो शेतकरीच काय नमो शेतकरी योजनेच सुद्धा पोर्टल आहे या पोर्टलची लिंक आपल्याला या ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे.
बेनिफिशरी स्टेटस वरती क्लिक करायच आहे. बेनिफिशरी स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुमचा आधार संलग्न मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून याच्यामधून माहिती पाहू शकता. याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून याच्या खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून तुमहाला ओटीपी मागवायचा आलेला ओटीपी एंटर करून गेट डाटा वरती क्लिक करायचे गेट डाटा वरती क्लिक केल्यानंतर तुमचं पीएम किसान रजिस्ट्रेशन कधी झाले
त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल तुम्ही पात्र आहात का दाखवल जाईल अपात्र असाल तर काय कारणासतो अपात्र आहे ते दाखवल जाईल याच्यापुढे तुम्हाला पीएफएमएस जे तुमचा लास्ट जनरेट झालेला आहे त्याचा स्टेटस दाखवली जाईल की तो कधी झाला होता तो फेल झाला तर बरेच जण म्हणतात की मला ला दुसरा हप्ता आला नाही तिसरा हप्ता आला नाही किंवा मला हफ्तेच आले नाहीत किंवा माझा एखादा हप्ता आलेला नाही तो बाद झाला वगैरे तर त्याच्यामध्ये तुमची स्टेटस या ठिकाणी पाहू शकता
आणि याच्याच खाली तुमचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हप्ता कधी आलेला आहे किती तारखेला आला ते पाहू शकता त्याच्यापुढे तुम्हाला लिंक नावाची एक ऑप्शन दिलेली आहे त्या लिंक वरती जर क्लिक कराल तर तुमचा तो लॉट कधी क्रिएट झाला होता तो तुमच्या बँकेत कधी क्रेडिट झाला आणि जर झालेला नसेल तर तो कोणत्या कारणास्तव तुमचं पेमेंट फेल झालय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता.
हे झालं नमो शेतकरीच्या पोर्टलवरती बेनिफिशरी च स्टेटस पाहण्याची माहिती ज्याच्यामध्ये तुम्ही अपात्र असाल तरी दाखवल जाईल पात्र असाल तरी दाखवल जाईल तुम्ही पात्र असून हप्ता जर आलेला नसेल तर तोही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला तुमचे एफटीओ च स्टेटस पाहायचे असेल जस आपण पीएम किसानचा एफटीओ जनरेट होतो तसच नमो शेतकरीचे सुद्धा एफटीओ जनरेट होतात कारण डीबीटीच्या माध्यमातून हे पेमेंट आहे. जर योजनेचा जीआर निधीचा आला त्याच्यानंतर एफटीओ जनरेट झाले तर तुमच्या पीएफएमए च्या पोर्टलला तुमचा एफटीओ दाखवला जाणार आहे.
पीएफएमए च्या पोर्टल वरती तुम्हाला ज्या ठिकाणी आपण पीएम किसान सिलेक्ट करतो त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या डीबीटी ची ऑप्शन देण्यात आलेली आहे. ही ऑप्शन सिलेक्ट करायची आहे तुमचा जो काही बेनिफिशरी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तो खालचा कॅप्चा कोड टाकायचा आणि गेट डाटा वरती क्लिक करायच तुमच्या एफटीओ ची स्थिती दाखवली जाईल.
पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि आता सातवा जनरेट झाल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये वरती तुम्हाला दाखवला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात का हे तपासू शकता तुमचा हप्ता कधी येणार आहे त्याची माहिती त्याठिकाणी पाहू शकता येणार आहे का पाहू शकता आलेला नसेल तर तेही पाहू शकता आणि हा हप्ता साधारणपणे 22 ऑगस्टच्या आसपास वितरित केला जाऊ शकतो
अशा शक्यता आता समोर आल्या कन्फर्म अशी डेट आणि कन्फर्म असा अपडेट याचा जीआर आल्यानंतर आणि याच्याबद्दल अपडेट दिल्यानंतर देखील नक्की घेऊयात तर अशा प्रकारचे काही महत्वाचे प्रश्न आणि महत्त्वाची माहिती होती जे आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद
महत्त्वाच्या लिंक
-
नमो शेतकरी पोर्टल – https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary
-
sarkari yojana – https://sarkariyojana.store/
-
पीएम किसान पोर्टल – https://pmkisan.gov.in/
निष्कर्ष
सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 22 ऑगस्टच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. निधीचा जीआर आल्यानंतर अधिकृत तारीख घोषित केली जाईल. तोपर्यंत वरील पद्धतीने तुम्ही तुमची पात्रता आणि हप्ता स्टेटस सहज तपासू शकता.