प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 2025: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 2025: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय"

नमस्कार मित्रांनो,
देशभरातील करोडो शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण या प्रतिक्षेत असतानाच एक अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 2025 ला अधिकृत मंजुरी दिली असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची ऐतिहासिक घोषणा

16 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील शेतकऱ्यांसाठी “प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना” या नव्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची घोषणा 2025-26 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती, आणि अखेर ती प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या मार्गावर आली आहे.

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना

नमस्कार मित्रांनो देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.

16 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो 2025-26 च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होती.  

आणि अखेर हीच योजना पुढील सहा वर्षांमध्ये राबवण्याकरता आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. दरवर्षी 24,000 कोटी एवढा खर्च करून 26 योजनांना एकत्र करून ही पीएम धनधान्य कृषी योजना ही योजना राबवली जाणार आहे आणि याच योजनेला अखेर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

योजनेच्या अंतर्गत देशभरामधील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. याच्यामध्ये ज्या 100 जिल्ह्यांची निवड केली जाईल या जिल्ह्यांचा समावेश करून पुढील सहा वर्षासाठी ही योजना देशभरामध्ये राबवली जाणार आहे.

याच्यामध्ये 36 योजनांच एकत्रीकरण करून 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याच्यामध्ये शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजार असतील, बीबियाणे असेल, खताची खरेदी असेल किंवा विविध प्रकारे केली जाणारी आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या विविध बाबींचा याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे.

योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध प्रकारचे जे काही आवश्यक असेल तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणं त्याच्यासाठी त्यांना अवजाराची जी काही असेल ते पुरवठा करणं सिंचन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं पिकांच्या साठवणुकीसाठी गोदामांची निर्मिती करणं उच्च गुणवत्ता असलेल बीबियान शेतकऱ्यांना पुरवठा करणं कृषीनिविषठा ज्याच्यामध्ये खतांचा पुरवठा असेल ट्रॅक्टर कृषी पंप असलेले ट्रॅक्टरचे अवजार अशा विविध बाबींना याठिकाणी अर्थसाहाय्य केला जाणार आहे

कर्जांचा पुरवठा केला जाणार आहे आणि अशा प्रकारच्या विविध बाबींचा या 36 योजनांच्या एकत्रीकरणामधून या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. याच्यामध्ये सरकारने कमी उत्पादकता जाहीर केलेले मध्यम पीकवाढ आणि मर्यादित कर्ज उपलब्ध असलेले जे काही 100 जिल्हे आहेत अशा 100 जिल्ह्याची ओळख पटवून त्याची निवड केली जाणार आहे आणि या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाणार आहे ज्याच्या अंतर्गत साधारणपणे एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.

हा उपक्रम राबवत असताना उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान विशिष्ट शेती याच्यानंतर पाण्याची कार्यक्षमता त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या जे काही अचूक बाबी असतील याचा अवलंब करणं शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं पीकपणीच्या नंतरच्या ज्या काही पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये गोदाम असेल किंवा मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी असतील सिंचनाचा विस्तार असेल ज्याच्यामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या बाबी असतील अशा सर्व बाबी याच्यासाठी आवश्यक असलेल तंत्रज्ञान हा सर्व लाभ या ठिकाणी या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे

आणि मित्रांनो अशा प्रकारच्या विविध योजनांच्या अभिसरणामधून एकत्रीकरणामधून शेतकऱ्यांसाठी पुढील सहा वर्षांमध्ये ही प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही योजना राबवली जाणार आहे.

ही योजना राबवण्यासाठी केंद्रीयमंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे याच्या अंतर्गत लवकरच जिल्ह्यांची निवड केली जाईल आणि याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील जे जे काही महत्त्वाचे अपडेट असतील ते ते अपडेट आता आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह

1 sarkariyojana.store

2 sarkari yojana GR

धन्यवाद

FAQ

 ही योजना केंद्र सरकारने 2025-26 पासून राबवण्याचा निर्णय घेतलेली असून, यामध्ये देशातील 100 निवडक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत दिली जाणार आहे.

 

 सरकारने कमी उत्पादनक्षमता आणि मर्यादित सुविधा असलेल्या 100 जिल्ह्यांची निवड करणार आहे. यादी लवकरच जाहीर होईल.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 16 जुलै 2025 च्या बैठकीत ही योजना मंजूर झाली असून, लवकरच अंमलबजावणी सुरू होईल.

 

बी-बियाणे, खत, सिंचन, शेती उपकरणे, कृषी पंप, ट्रॅक्टर अवजारे, गोदाम सुविधा, कर्ज सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा इत्यादींचा समावेश आहे.

सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.

Farmer Id login करताना Otp येत नाही त इथे पहा सर्व माहिती 2025

Farmer Id login करताना Otp येत नाही

परिचय

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असतात. परंतु, अनेकदा योग्य माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक नवा उपक्रम सुरू केला आहे – Farmer ID योजना 2025.

या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Farmer Unique ID) दिला जाणार आहे, ज्याच्या आधारे शेतकऱ्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार असून योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि वेगाने दिला जाणार आहे

Otp Problem असा करा दुरुस्त

नमस्कार मित्रांनो अ‍ॅग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती फार्मर आयडी सह लॉगिन करत असताना ओटीपी येत नाही किंवा युजर डज नॉट एक्झिट अशा प्रकारचा एरर येतो आणि हाच एरर सॉल्व कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या ह्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची अ‍ॅग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे त्यांचे सेंट्रल फार्मर आयडी देखील जनरेट झालेले आहेत.

परंतु अशा शेतकऱ्यांना आपल ग्रीस्टक वरती लॉगिन करत असताना आपलं लॉगिन करता येत नाही लॉगिन करत असताना युजर डज नॉट एक्झिट दाखवतो किंवा त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येत नाही अर्थात त्यांना लॉगिन करून आपल्या फार्मर आयडीची जी काही स्थिती आहे.

ती पाहता येत नाही मित्रांनो लवकरच याच्यामध्ये आता अपडेटचे ऑप्शन येणार आहे याच्यापूर्वी सुद्धा अपडेटचे ऑप्शन आलेले होते शेतकऱ्यांना जर जमीन ऍड करायची असेल डिलीट करायची असेल किंवा इतर काही चुका असतील तर दुरुस्त करायचे असतील किंवा इतरही काही आपल जर फार्मर आयडीचा डाटा पाहायचा असेल या सर्वांसाठी लॉगिन करणं अतिशय गरजेच असणार आहे.

परंतु या अग्रेस्टकच्या पोर्टलवरती शेतकरी म्हणून लॉगिनच शेतकऱ्यांना न करता आल्यामुळे पुढच्या प्रक्रिया पार पाडता येत नाहीत आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना अग्रेस्टकच्या पोर्टलवरती लॉगिन करणं अतिशय महत्त्वाच आहे मित्रांनो लॉगिन करत असताना आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून ओटीपी साठी एंटर केलं तर ओटीपी येत नाही.

किंवा याच्यामध्ये जनरेट फरगॉट पासवर्ड केलं तर फरगॉट पासवर्डला सुद्धा युजर डज नॉट एक्झिट अस दाखवतो अशा प्रसंगी काय करायचं आपण जर सीएससी सेंटर वरती फार्मर आयडी बनवलेला असेल किंवा इतर काही ठिकाणावरून आपण फार्मर आयडी जनरेट केलेला असेल तर सर्वात प्रथम काय करायचं की जी काही अ‍ॅग्रीस्टॅक ची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती यायच https://mhfr.agristack.gov.in याच्यामध्ये आपल्याला ज्या खाली ऑप्शन दाखवलेले आहे.

फार्मर लॉगिन आणि ऑफिशियल लॉगन त्याच्यामधील फार्मर लॉगिन वरती क्लिक करायच आता फार्मर वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता लॉगिन साठी ऑप्शन आहे ज्याच्यामधून आपल्याला ओटीपी येत नाही परंतु याच्याच खाली आपल्याला रजिस्ट्रेशन च एक ऑप्शन दिलेली आहे.

न्यू रजिस्ट्रेशन म्हणून या न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं या न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला मागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड नंबर याच्यामध्ये आपला आधार नंबर एंटरकरायचा आहे आधार नंबर एंटर करून खाली व्हेरिफाय ऑप्शन वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती हा ओटीपी येणार आहे

Otp Problem असा करा दुरुस्त
Otp Problem असा करा दुरुस्त

मित्रांनो मोबाईलवरती आलेला ओटीपी एंटर ओटीपी च्या बॉक्स मध्ये आपल्याला एंटर करायच आहे ओटीपी एंटर केल्यानंतर खाली व्हेरिफाय नावाचे ऑप्शन दिलेले व्हेरिफाय वरती क्लिक करायच आहे ओटीपी व्हेरिफाय झाल्याबरोबर आपल्यासमोर दुसरा पेज खुलेल ज्याच्यामध्ये आपल्याला जो मोबाईल नंबर या ऍड्रेस चेक बरोबर लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी सांगितला जाईल याच्यामध्ये दिलेल्या बॉक्समध्ये आपला चालू असलेला आणि आपण जो वापरणार आहात तो मोबाईल नंबर द्यायचा आहे.

Otp Problem असा करा दुरुस्त

मोबाईल नंबर एंटर केल्याबरोबर साईडला क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी सांगितल जाईल त्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल इथे दिलेल्या बॉक्स मध्ये आपल्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी एंटर करून व्हेरिफाय वरती क्लिक करायचे आपला मोबाईल नंबर व्हेरिफाय झालेला आहे मित्रांनो मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे.

Farmer ID योजना

भविष्यात लॉगिन करण्यासाठी हा पासवर्ड आपल्याला कामी येणार आहे दोन वेळेस हा पासवर्ड टाकून याला आपल्याला सेव अड कंटिन्यू करायच आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा सेट झालेला अस आपल्याला दाखवला जाईल ओके करायच पुन्हा एकदा आपल्याला लॉगिनच्या पेजवरती यायच लॉगिनच्या पेजवरती आल्यानंतर आपण दिलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून आपण जो सेट केलेला आहे तो पासवर्ड किंवा जो ओटीपी आहे हा ओटीपी मागून सुद्धा याच्यामध्ये लॉगिन करू शकता.

आपण पाहू शकता आपलं अ‍ॅग्रीस्टॅक  च्या आपल्या फार्मर आयडीच्या पेजला आपलं लॉगिन झालेला आहे भविष्यामध्ये याच्यामध्ये काही असेल किंवा काही प्रक्रिया असतील काही आपल्याला पाहायचं असेल तर याच लॉगिनच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला नंबर जरी चेंज करायचा असेल तर जुना नंबर व्हेरिफाय करून आपण याच्यामध्ये नवीन नंबर सुद्धा जोडू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या येणाऱ्या एररच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो.

मित्रांनो प्रत्येक फार्मर आयडी बरोबर सेपरेट मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करा कारण ओटीपी येत असताना समस्या येणार नाहीत केल्यानंतरच पुढे ज्या काही भविष्यामध्ये तुम्हाला दुरुस्त्या किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहेत धन्यवाद

🎯 या योजनेचे मुख्य उद्दिष्टे

  • शेतकऱ्यांचा डेटा एकत्र करणे
  • योजनांचा थेट लाभ सुलभ करणे
  • डिजिटल कृषी सेवांचा फायदा वाढवणे
  • बोगस लाभार्थ्यांना रोखणे
  • शेतीविषयक निर्णय अधिक डेटा-आधारित करणे

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • उत्पन्नाचा दाखला (आवश्यकतेनुसार)
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर

Farmer ID चे फायदे

  1. शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवता येईल
  2. पीक विमा, अनुदान, कर्ज योजना मिळवण्यास मदत
  3. कृषी विभागाकडून नवीन माहिती थेट मिळणार
  4. जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित
  5. एकच ID वापरून अनेक योजना लागू करता येतील

.निष्कर्ष

Farmer ID योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही ओळखपत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली Farmer ID बनवावी आणि योजनेचा लाभ घ्यावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. ही Farmer ID मिळवणं अनिवार्य आहे का?
हो, भविष्यात सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ही ओळख अत्यावश्यक होईल.

Q2. मी जमीनीचा मालक नाही, तरी अर्ज करू शकतो का?
जर तुम्ही बटाईदार असाल, तर स्थानिक अधिकाऱ्यांची शिफारस घेऊन अर्ज करता येईल.

Q3. ही सेवा फ्री आहे का?
हो, Farmer ID साठी अर्ज करणे पूर्णपणे मोफत आहे.

Navin mahiti sathi yethe clik kara sarkariyojana.store