खुशखबर फार्मर ID वर मिळणार केसीसी आणि पशु केसीसी कर्ज – आता घरबसल्या अर्ज करा

खुशखबर फार्मर ID वर मिळणार केसीसी आणि पशु केसीसी कर्ज – आता घरबसल्या अर्ज करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आपण सध्या कृषिक्षेत्रामध्ये तांत्रिक प्रगतीचा काळ अनुभवत आहोत. अग्रेसक (Agri Stack) योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या फार्मर ID  म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र धारक शेतकऱ्यांसाठी आता केंद्र शासनाकडून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे.

केंद्र शासनाने आता केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) व पशु केसीसी यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी ‘जनसमर्थ पोर्टल’ हे स्वतंत्र पोर्टलही कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

जनसमर्थ पोर्टलची वैशिष्ट्ये:

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • 250 पेक्षा जास्त बँका यात सहभागी

  • आपली पात्रता (Eligibility) तपासण्याची सुविधा

  • पशुधन, मत्स्य व्यवसाय, पीक कर्ज, इतर पायाभूत सुविधा यासाठी अर्ज

  • शेतकऱ्यांना त्याच गावातील अग्रणी बँक निवडण्याची मुभा

केसीसी कर्जासाठी कोण पात्र?

  • ज्या शेतकऱ्यांचा फार्मर युनिक ID जनरेट झालेला आहे

  • जे शेतकरी पीक विमा किंवा कृषी योजनांचे लाभ घेत आहेत

  • शेतकऱ्यांनी ग्रीस्टॅक पोर्टलवर स्वतःची नोंदणी पूर्ण केलेली आहे

  • sarkariyojana.store

सर्व माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रेसक योजने अंतर्गत फार्मर युनिक ID अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दीलासदायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो फार्मर ID जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना आता केंद्र शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने केसीसी पशु केसीसी देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी जनसमर्थ केसीसी हे पोर्टल देखील सुरू करण्यात आलेले आहे याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या ह्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वीच आपण अपडेट घेतल होत की आरबीआय च्या माध्यमातून एसबीआय याचबरोबर नाबार्ड यांच्या माध्यमातून एक ऑनलाईन पद्धतीने पोर्टल विकसित केल जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये कुठल्याही कागदपत्राशिवाय कुठल्याही बँकेचे हेलपाटीनमा शेतकऱ्यांना घर बसल्या पीक कर्जासाठीची मागणी करण्याची याच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली होती.

हे ऐकायला नवल वाटत होतं बऱ्याच जणाला याच्यावरती विश्वास बसत नव्हता आणि याची अंमलबजावणी अखेर आता सुरू करण्यात आलेली आहे ही अंमलबजावणी करत असताना आपण पाहिलेलकी अग्रेसटॅकच्या अंतर्गत जो फार्मर आयडी जनरेट केला जातोय या फार्मर आयडी च महत्त्व सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलेल आहे त्याच महत्त्व आता शेतकऱ्यांना समजून यायला लागलेले आहे.  

पीक विमा भरत असताना असेल किंवा इतर कृषी योजनांचे लाभ असतील हे सर्व आता या ग्रीस्टॅकच्या फार्मर ID नुसारच दिले जात आहेत आणि या जनरेट झालेल्या फार्मर आयडीच्या बेसवरती आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धती प्ने केसीसी उपलब्ध करून दिले जाणार आहे.  

याच्यासाठी जनसमर्थ हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना आता आपण स्वतः केसी साठी पात्र आहात का हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येत शेतकऱ्यांना स्वतः आता घर बसल्या या केसीसी साठी अप्लाय करता येतं आणि अशा प्रकारचे पोर्टल सुरू झाले ग्रेस्टेकच्या पोर्टल वरती सुद्धा आता तुम्ही केसीसी साठी प्लकेबल आहात का केसीसी साठी तुमची एलिजिबिलिटी आहे का हे सुद्धा चेक करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.  

ज्या ठिकाणी आपण आपल्या ग्रीस्टकच्या पोर्टल वरती नोंडणीची स्थिती पाहत होतो याच ठिकाणी तुम्हाला केसीसी साठी तुमची एलिजिबिलिटी आहे का ते सुद्धा पाहण्याच पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले मित्रांनो पशु केसीसी याच बरोबर इतर जे काही पायाभूत सुविधांसाठीचे कर्ज असतील अशा प्रकारचे सहा उपक्रम याच्या माध्यमातून राबवले जात आहेत 250 पेक्षा जास्त बँका याच्यामध्ये आरबीआय च्या माध्यमातून जोडण्यात आलेले आहेत आपलं बँक खात असलेली बँक किंवा आपल्या भागातील असलेली अग्रणी बँक किंवा आपल्या गावाला दत्त घेतलेली बँक जी काही बँक उपलब्ध असेल त्या बँकेची निवड करून आपण या केसीसी कार्डची जी काही मागणी आहे ती मागणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. https://www.jansamarth.in या जनसमर्थ पोर्टलवर भेट द्या.

  2. “Apply for KCC” या पर्यायावर क्लिक करा.

  3. आपला फार्मर युनिक आयडी / मोबाईल नंबर टाका.

  4. OTP द्वारे लॉगिन करा.

  5. अर्जामध्ये आपली माहिती भरा आणि बँकेची निवड करा.

  6. सबमिट बटण क्लिक करा.

निष्कर्ष:

शेतकरी मित्रांनो, हे वास्तवातले डिजिटल भारताचे चित्र आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या कर्ज मिळण्याची सोपी, पारदर्शक आणि प्रभावी सुविधा सुरू झाली आहे.
फार्मर ID असलेले प्रत्येक शेतकरी आजच जनसमर्थ पोर्टलवर जाऊन केसीसी कर्जासाठी अर्ज करा, आणि सरकारच्या या नव्या डिजिटल योजनेचा लाभ घ्या.

FAQs

फार्मर युनिक आयडी (Farmer Unique ID) म्हणजे सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला दिले जाणारे एक डिजिटल ओळखपत्र आहे. याच्या आधारे शेतकऱ्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवता येतो.

तुम्ही https://agrimachinery.nic.in किंवा ग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी स्थिती तपासू शकता.

केसीसी (Kisan Credit Card) ही एक कृषिकर्ज योजना आहे, जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदराने पीक कर्ज दिले जाते.

तुम्ही www.jansamarth.in या पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासू शकता व फार्मर आयडीच्या आधारे अर्ज करू शकता.

पशु केसीसी म्हणजे गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या इत्यादींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी मिळणारे विशेष कृषिकर्ज. हे सुद्धा केसीसी योजनेचा भाग आहे.

अर्ज करताना बँक लिस्टमध्ये तुमची बँक निवडा. देशभरातील 250+ बँका या पोर्टलशी जोडलेल्या आहेत.