E Pik Pahani प्रक्रियेत गोंधळ
नमस्कार मित्रांनो,
राज्यातील शेतकऱ्यांसाठी E Pik Pahani ही आता केवळ औपचारिकता नसून, योजनांचे लाभ मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया बनली आहे. पीक विमा, अनुदान, कृषी योजनांचा लाभ, पीक कर्ज आदींसाठी सातबाऱ्यावर पिकाची नोंद आवश्यक असते.
पण गेल्या 13 दिवसांपासून E Pik Pahani प्रक्रियेत तांत्रिक बिघाड असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. अॅप्लिकेशन वारंवार एरर दाखवते, ओटीपी उशिरा येतो, स्टेप पूर्ण होत नाही.
परगावावरून आलेले शेतकरी निराश परत जात आहेत तर गावातील शेतकरी दिवसन्दिवस प्रयत्न करूनही पाहणी पूर्ण करू शकत नाहीत.
यामुळे अनेकांना कांदा, सोयाबीन, कापूस अनुदान तसेच पीक विमा यांसारख्या लाभांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाकडून 14 ऑगस्ट–सप्टेंबरनंतर पाहणी न झाल्यास लाभ मिळणार नाही, असे सांगितले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

E Pik Pahani प्रक्रियेत मोठा गोंधळ – शेतकऱ्यांचे नुकसान
-
ई-पीक पाहणीचे महत्त्व – पीक विमा, अनुदाने, कृषी योजनांचे लाभ, पीक कर्ज आदींसाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पीक नोंद आवश्यक.
-
सध्याची अडचण – अॅप्लिकेशन/पोर्टल वारंवार एरर देत आहे. ओटीपी येण्यात उशीर, स्टेप पूर्ण न होणे, दिवसन्दिवस प्रयत्न करूनही यश नाही.
-
शेतकऱ्यांचा त्रास – परगावावरून आलेले शेतकरी निराश परत जात आहेत. गावातील शेतकऱ्यांनाही अनेकदा प्रयत्न करूनही पाहणी पूर्ण होत नाही.
-
तांत्रिक त्रुटीचे परिणाम – कांदा, सोयाबीन, कापूस अनुदान, पीक विमा यांसारख्या लाभांपासून वंचित राहण्याचा धोका.
-
शेतकऱ्यांची मागणी – अॅप/पोर्टल त्वरित सुरळीत करावे, तांत्रिक बिघाडांसाठी जबाबदार कंपन्यांकडून दंड वसूल करावा, प्रक्रिया सोपी व सर्वांसाठी सुलभ करावी.
-
अंतिम मुदत दडपण – 14 ऑगस्ट–सप्टेंबरनंतर पाहणी न झाल्यास योजना लाभ मिळणार नाहीत, त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत.

नमस्कार मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या सातबाऱ्याला आपल्या शेतातील पिकाची नोंद अर्थात आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी करण्यात आलेली तरतूद म्हणजे ई पीक पाहणी गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर E PIk Pahani न करण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच नुकसान झालेल आहे
आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकरी सजग झालेले आहेत E Pik Pahani करण्यासाठी सज्ज झालेले आहेत काही शेतकऱ्यांना ईपीक पाहणी न करण्यामुळे कांद्याच अनुदान आलं नाही काही शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचा अनुदान आलं नाही काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही
तर काही शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नव्हता कारण होतं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला ई पीक पाहणी न होणं किंवा त्या त्या पिकाची नोंद न होणं परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणी करण्यात आली रबी हंगामात E Pik Pahani करण्यात आली उन्हाळी हंगामात ई पीक पाहणी करण्यात आली आणि अगदी खरीप 2025 मध्ये सुद्धा शेतकरी इपीक पाहणी कधी सुरू होणार याची वाट पाहत होते पीक पाहणी सुरू झाली
पीक पाहणीच महत्त्व पटवून सांगण्यात आलं ईपीक पाहणीची आवश्यकता पीक पाहणीच्या गरजा या सर्व बाबी सांगण्यात आल्या त्याच्यासाठी अप्लिकेशन अपग्रेड करण्यात आलं आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर आता फार्मर आयडी अर्थात ग्रीस्टक च अंतर्गत ईपीक पाहणी अतिशय महत्त्वाची अशी झालेली आहे
कारण शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे आता पिकाची नोंद कुठल्याही पोर्टलला लावता येणार नाही ईपीक पाहणीचा जो आहे तो डाटा आता त्या पोर्टलला घेतला जाणार आहे परंतु मित्रांनो ई पीक पाहणी सुरू झाली अप्लिकेशन अपडेट करण्यात आलं त्याचा गाजावाजा जाहिराती अमुक तमुक सगळं करण्यात येते परंतु प्रत्यक्षात ईपीक पाहणी करता येत नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्यासाठी प्रयत्न केले जात परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अंतराळचा एरर येतोय कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितल जातय परत ट्राय करा आता एक ते दोन दोन ते तीन दिवसापासून आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन काही माहिती नवीन काही शेतकऱ्यांसाठी अपडेट दिले जातात की तुम्ही ऑफलाईन करा परत शेतात गेल्या ऑनलाईन करा तुम्ही रात्री जा अपरात्री जा त्याच्यानंतर सकाळी दिवसा जाऊन परत अपडेट करा या सर्व बाबी शेतकऱ्यांसाठी सोप्या आणि सहज नाही किंवा त्या करणही शक्य नाही

बरेच सारे शेतकरी कामानिमित्त आपल्या गावापासून स्थलांतरित झालेले येतात त्यांना पीक पाहणी करण्यासाठी कधीतरी शनिवारी रविवारी आपल्या गावाकडे यावं लागतं असे शेतकरी शनिवारी रविवारी गावाकडे येतात दिवसभर शेतात उभे राहतात परंतु दिवसभर उभा राहून सुद्धा इ पीक पाहणी करता आली नाही आणि आता काय सांगितलं जात तर रात्री पीक पाहणी करा
मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर खूप मोठं फेलर हे कृषी विभागाचा आहे राज्यशासनाच आहे कारण कृषी विभागाचे योजना असतील किंवा इतर काही लाभ असतील यासाठी शेतकरी किंवा आपल्या सातबाराला पीक पेऱ्याची नोंद व्हावी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण असेल किंवा शेतकऱ्यांना आता नवीन जनसमर्थ पोर्टलवरती पीक कर्ज उपलब्ध करून देण असेल किंवा कृषी विभागाच्या योजनांचे लाभ घेण्यासाठी असेल विविध बाबीसाठी ईपीक पाहणी महत्त्वाची आहे. अक्षरशः 13 दिवस लोटून गेलेलेत उलटून गेलेले आहेत.
अद्याप किती शेतकऱ्यांची पीक पाहणी झाली याचा आकडा कृषी विभाग देऊ सुद्धा शकत नाही. एवढी लाजीरवाणी बाब या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता परगावावरून येणारे शेतकरी हे ईपीक पाहणीच्या उद्देशाने येतात आणि ईपीक पाहणी न करताच ते परत जाता आहेत
त्यांचा या ठिकाणी तोटा होतोय जे शेतकरी गावात राहतात किंवा जे शेतकरी शेती करतायत त्यांना देखील आपली ईपीक पाहणी करता येत नाही दिवस दिवस शेतकरी ओटीपी साठी वाट पाहत आहेत दिवस दिवस शेतकरी पुढे पुढच्या स्टेपवरती जाण्यासाठी वाट पाहत आहेत आणि आता परत रात्री जाऊन ईपीक पाहणी करा असं सांगणं म्हणजे याच्या इतका मोठा फेलर कुठलाही नाही
हजारो लाखो करोडो रुपये हे प्लिकेशन बनवण्यासाठी प्लिकेशन मेंटेन ठेवण्यासाठी पोर्टल अपडेट ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दिले जात आहेत आणि जर ते पोर्टल जर ते प्लिकेशन जर व्यवस्थित काम करत नसतील जर त्याच्यावरती एरर येत असतील तर हे दिलेले पैसे त्या कंपन्याकडून वसूल केले गेले पाहिजेत त्यांना फाईन मारले गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला हा उपक्रम शेतकऱ्यांना वापरता येणं गरजेच पीक पाहणीचा एक राज्यामध्ये खेळ मांडलेला आहे शासनान कृषी विभागान महसूल विभागान जे कोणी याच्यामध्ये असतील जे कोणी याच्यात लीड घेत असतील त्यांनी याला कुठेतरी पाहणं गरजेच आहे आणि इपीक पाहणी राज्यामध्ये सुरळितपणे सुरू करणं गरजेच आहे
आता ईपीक पाहणी करून घ्या करून घ्या करून घ्या रोज सांगितलं जातय 14 ऑग सप्टेंबर नंतर तुम्हाला करता येणार नाही सांगितल जातय पुन्हा सहायकाच्या माध्यमातून ईपीक पाहणी करायची द रुपया शुल्क त्यांना दिलं जाणार आहे पण त्यांच्या द रुपयाच्या शुलका साठी जर पुन्हा शेतकऱ्यांना आणखीन मरमर जर करावी लागली तर त्याच्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण ई पीक पाहणी करण्यासाठी जर कोणाच्या दुसऱ्याच्या माध्यमातून पी पाहणी करायची असेल तर शेतकऱ्यांना मोठा खर्चाचा भार या ठिकाणी सहन करावा लागतो अशी परिस्थिती येऊ नये हीच या ठिकाणी अपेक्षा गांभीर्याने घेऊन ही पीक पाहणी सुरळित करावी हीच एक अपेक्षा धन्यवाद