PM किसान 20वा हप्ता 2 ऑगस्टला खात्यात
नमस्कार शेतकरी मित्रांनो!
देशभरातील 9.7 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता (20वा हप्ता) 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाणार आहे.
हप्ता मिळण्यात उशीर का झाला?
आपल्यातील अनेक शेतकरी मित्रांना या हप्त्याच्या वाटपामध्ये उशीर का झाला हे समजून घेणे गरजेचे आहे:
eKYC अपडेट न केल्यामुळे काही लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते.
वॅलेंटरी सरेंडर केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात वेळ गेला.
काही अपात्र लाभार्थी पात्र ठरल्यावर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना जोडले गेले.

नमस्कार मित्रांनो 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसानचा पुढील अर्थात विसावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे परंतु हप्ता वितरित केला जात असताना आपण पाहिलेल की मोठ्या प्रमाणात विलंब झाला तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्ेंटरी सरेंडर करण्यात आलेल होत त्यांना पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी याचबरोबर बरेच सारे असे लाभार्थी होते जे काही विविध कारणामुळे अपात्र करण्यात आलेले होते ते सुद्धा आता या योजनेमध्ये कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर जोडण्यात आलेले येतात आणि 9.7 कोटी अर्थात 9 कोटी 70 लाख लाभार्थ्यांना हा आता येणारा हप्ता वितरित केला जाणार आहे
हप्त्याचे वितरणाची तारीख जाहीर झाल्यानंतर पुन्हा लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की मग हा येणारा हप्ता मला येणार का मित्रांनो अगदी दोन मिनिटांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने येणारा हप्ता माझ्या खात्यामध्ये येणार का हे चेक करू शकता आणि याचीच माहिती आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपण पीएम किसानच्या वेबसाईटवरती सुद्धा आपली पात्रता तपासू शकता परंतु याच्यामध्ये पात्र असलेले पण बरेच सारे लाभार्थी ज्यांना हप्त्याच
वितरण होत नाही मग परिपूर्ण आपल्याला 100 टक्के हप्ता येणार का हे तपासण्यासाठी आपण पीएफएमएस च्या वेबसाईटवरती जाऊ शकता पीएफएमएस च्या वेबसाईटची लिंक आपल्याला ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे. या पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत.
याच्यामध्ये पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत एक ऑप्शन आहे ते म्हणजे डीबीटी स्टेटस ट्रॅकर. या डीबीटी स्टेटस ट्रॅकरची लिंक सुद्धा आपल्याला या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल. या लिंकवरून सुद्धा आपण डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता. आता या लिंक वरती आल्यानंतर क्लिक केल्याबरोबर आपल्याला काय की वेगवेगळ्या योजना निवडासाठी ऑप्शन आहे म्हणजे कोणत्या योजनेची आपल्याला माहिती पाहिजे याच्यामधून आता आपण पीएम किसान पाहणार आहोत म्हणून आपल्याला या यादीमधून पीएम किसान निवडायचे आता पीएम किसान निवडल्यानंतर त्याच्यामध्ये बेनिफिशरी व्ॅलिडेशन आणि पेमेंट असे ऑप्शन दाखवल्या जातात याच्यामध्ये पेमेंट वरती आपल्याला क्लिक करायच पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे
जो एमएच पासून चालू होतो तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर पीएम किसान वेबसाईटवरून नो यर रजिस्ट्रेशन नंबर मधून काढू शकता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करायचा आणि कॅप्चा कोड एंटर करून सर्च केल्याबरोबर आपल्या हप्त्याची जी काही स्थिती आता येणारा जो हप्ता आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दाखवली जाणार आहे आता याच्यामध्ये एफटीओ कधी जनरेट झाला आता आपण पाहू शकता 12 जून 13 जूनला पेमेंट हे जनरेट झालेले आहे आता हे पूर्ण त्याला अप्रूव मिळालेले आहे
फक्त आता वेटिंग फॉर बँक म्हणजे बँकेच्या माध्यमातून खात्यावरती ट्रान्सफर करण्यामध्ये म्हणजे आता त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती वितरित करण्याच्या संदर्भातील कारवाई फक्त बाकी आहे याच्यामध्ये 13 जूनचा 14 जूनचा काही जणाला 12 जून च दाखवत आहेत म्हणजे आपला हप्ता हा 100% या तारखेला क्रेडिट केला जाणार परंतु जर एखाद्या लाभार्थ्याचा हप्ता येणार नसेल समजा आता उदाहरणार्थ आपण दुसरा एक याच्यामध्ये बेनिफिशरी नंबर टाकला आणि सर्च केलं तर पाहू शकता या लाभार्थ्याला जुन्या हप्त्याची स्थिती दाखवते आता हा जो येणारा विसावा हप्ता आहे याच्याबद्दलच कुठलही अपडेट या खात्यामध्ये झालेली नाही अर्थी या लाभार्थ्याला हा येणारा हप्ता येणार नाही आणि तुम्हाला जर अशा प्रकारे एफटीओ वगैरे तुमचे जर जनरेट झालेलीची माहिती दाखवत असेल तर 100% तुम्हाला हप्ता येणार आहे
परंतु जर तुमची काही माहिती याच्यामध्ये अपडेट झालेली नसेल तर तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो जो तुम्ही पीएम किसान वरती पाहू शकता किंवा इतर काही त्याच्यामध्ये कारण असतात विविध कारण आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर अशी यापूर्वीच माहिती घेतली तर माझा हप्ता येणार का हा जो एक महत्त्वाचा असा प्रश्न होता त्याच एक उत्तर अगदी दोन मिनिटामध्ये घर बसले आपण चेक करू शकता.
धन्यवाद
पद्धत 1: पीएम किसान पोर्टलवरून तपासा
-
वेबसाईटला भेट द्या: https://pmkisan.gov.in
-
मेनूतील “Know Your Status” किंवा “Beneficiary Status” वर क्लिक करा.
-
तुमचा PM-KISAN रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.
-
कॅप्चा टाका आणि “Get Data” वर क्लिक करा.
-
तुमचा हप्ता जमा झाला आहे का, FTO जनरेट झाला आहे का, याची माहिती लगेच मिळेल.
निष्कर्ष:
📌 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे.
📌 तुम्ही पात्र असाल, FTO जनरेट झाले असेल, तर खात्रीने तुमच्याही खात्यावर हप्ता जमा होणार आहे.
📌 वर दिलेल्या पद्धती वापरून घरबसल्या दोन मिनिटात तुमचा हप्ता येणार का हे चेक करा.