नमस्कार शेतकरी मित्रांनो
राज्यातील सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर पंपांच्या अंमलबजावणीत अडथळे, तक्रारी आणि दुरुस्तीच्या समस्या याबाबत शेतकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी मागील काही काळात पुढे आल्या आहेत. सोलर पंप लावण्यासाठी पैसे भरूनही पंप बसवले जात नाहीत, बसवलेले पंप निकृष्ट दर्जाचे असतात किंवा दुरुस्ती होत नाही – या साऱ्या समस्यांवर आता शासनाकडून लक्ष दिलं जात आहे.
7.5 HP च्या जागी मिळणार 10 HP सोलर पंप
7.5 HP च्या जागी मिळणार 10 HP सोलर पंप!
फेब्रुवारी 2025 मध्ये निर्गमित परिपत्रकानुसार, ज्या शेतकऱ्यांची पात्रता 7.5 HP पर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना आता 10 HP क्षमतेचा सोलर पंप घेता येणार आहे. परंतु, वाढीव HP साठी लागणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावा लागेल.
पंपाच्या HP नुसार पात्रता व सुविधा:
शेतजमिनीचे क्षेत्र | सोलर पंप HP |
---|---|
2.5 एकरपर्यंत | 3 HP |
2.5 ते 5 एकर | 5 HP |
5 एकरपेक्षा जास्त | 7.5 HP |
नवीन पर्याय: 7.5 HP पात्र शेतकरी आता 10 HP सोलर पंप घेऊ शकतात!
💰 सोलर पंपांची किंमत:
सोलर पंप HP | अंदाजित किंमत (₹) |
---|---|
7.5 HP | ₹ 4,07,552 |
10 HP | ₹ 5,12,100 |
🔸 या दोन्ही किंमतींमधील तफावत आणि 10 HP साठी लागणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांनी स्वतः भरावा लागतो.
नवीन अपडेट 7.5 HP च्या जागी मिळणार 10 HP सोलर पंप
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीची गती कुठेतरी मंदावली आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत पैशाचा भरणा केलेला आहे.
सोलर पंप लागत नाही लागलेला सोलर पंप सदोष आहे पुरवठादाराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली जात नाही आणि अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडणीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात याठिकाणी प्रश्नोत्तर झालेले होते
आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी रिन्यूएबल पर्यायाच्या माध्यमातून जे काही सोलर असेल किंवा इतर पर्याय असतील याच्या माध्यमातून विजेच्या निर्मितीवरती भर दिला जातोय याच्या संदर्भातील वेगवेगळ्या जे काही योजना आहेत किंवा वेगवेगळे जे काही प्रकल्प आहेत
त्याला मंजुऱ्या दिल्या जात आहेत आणि याच्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील घेतला जातोय आणि मित्रांनो याच पार्श्वभूर्ती झालेल्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठीचे निर्देश देण्यात येत आहेत मित्रांनो हे सर्व होत असताना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 7.5 एचपी पर्यंतच्या मागणी केलेल्या शेतकऱ्यांना 10 एचपी पर्यंतचे सोलर पंप देखील उपलब्ध करून द्यावेत उपलब्ध करून दिले जात आहेत
अशा प्रकारची माहिती दिली आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांच्या माध्यमातून याच्याबद्दल विचारणा केली जात आहे की हा काही नवीन प्रकार आहे अशा प्रकारचे काही 10 एचपी पर्यंतचे सोलर मिळतात का जर सोलरची कॅपॅसिटी वाढवून मिळत असेल तर त्याच्यासाठीची काही तरतूद आहे
का त्याच्यासाठी काय चार्ज हो याच्यासाठीची तरतूद आहे आणि याच्यासाठीचा एक महत्त्वाचा असा जीआर परिपत्रक हे फेब्रुवारी 2025 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो या परिपत्रकाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याची 7.5 एचपी पर्यंतची कॅपॅसिटी आहे अशा शेतकऱ्यांना 10 एचपी पर्यंतचा सोलर पंप घेता येतो.
राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अडीच एकर पर्यंतचे जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना 3 एचपी चा पंप त्याचबरोबर अडीच ते पाच एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना पाच एचपी चा पंप आणि पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी चा पंप देण्याची तरतूद आहे.
आता याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रेशर मिळत नाही किंवा पाण्याची व्यवस्थित फेक होत नाही अशा अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला जर वाढीव एचपीचा सोलर पंप घ्यायचा असेल तर त्याच्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता जास्तीत जास्त 7.5 एचपी पर्यंतचा सोलर पंप हा कॅपॅसिटनुसार पात्रतेनुसार देण्याची तरतूद आहे.
आता याच्यामध्ये असलेली या सोलर पंपाची किंमत आहे ही किंमत 7.5 एचपी च्या पंपाची 407,552 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. तर 10 एचपी च्या सोलर पंपाची जी किंमत असणार आहे ती 512100 रुपये एवढी असणार आहे.
आता याच्यामध्ये 512100 रुपये आणि 407,552 एवढी किंमत या 10 एचपी च्या सोलर पंपाची असणार आहे आणि याच्यामधील जी काही तफावत असेल किंमतीमधील ती तफावत प्लस शेतकऱ्यांना 7.5 एचपी पर्यंतचा जो काही भरणा असेल 10% पाच टक्के हा भरणा या ठिकाणी भरून 10 एचपीचा पंप लावता येणार आहे.
तर अशा प्रकारची तरतूद आहे अशा प्रकारचा जीआर आहे अशा प्रकारची योजना आहे फक्त या योजनेची अंमलबजावणी होत नाही आणि ती लवकरात लवकर करावी यासाठी आता पाठपुरावा बैठक झालेली होती याच्यासाठी आढावा बैठक झालेली होती आणि त्याच्या माध्यमातून ते निर्देश देण्यात आलेले आहेत
वाढीव एचपीचा सोलर पंप घेतला जात असताना सबसिडी व्यतिरिक्त जी काही रक्कम असेल त्या एचपीच्या पुढील एचपी पर्यंतची जी काही किंमत असेल ती किंमत शेतकऱ्यांना स्वतःचा भरणा म्हणून करावी लागते.
तर मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भातील प्रश्न विचारले जात होते आणि बऱ्याच जणाला या जीआर बद्दल माहिती नव्हती जी माहिती आजच्या ब्लॉग पोस्ट माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह
शेवटी एक विनंती:
शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी स्थानिक कृषी अधिकारी, महावितरण किंवा अधिकृत वेबसाईटवर संपर्क करून सर्व माहिती मिळवा. कोणत्याही एजंटकडे न भरवसा ठेवता अधिकृत मार्गाने अर्ज करा.
👉 तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा किंवा पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत जोडा राहा!
धन्यवाद 🙏