जनसमर्थ पोर्टल KCC
नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शकपणे सुलभ रीत्या अगदी जलद आणि कुठल्याही कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थात किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी देशभरामध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे
01 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये देशभरामध्ये ही मोहीम राबवली जात आहे ज्याच्या अंतर्गत नवीन शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज असतील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज फेडलेले आहेत त्यांना नवीन पीक कर्ज घ्यायचेत असे शेतकरी असतील पशुपालक असतील पशुपालकांसाठी पशु केसीसी असेल या सर्वांची उपलब्धता आता जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे
जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही शेतमाल तारण योजना असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल पशु केशसी असेल अशा वेगवेगळ्या बाबीचा लाभ दिला जात आहे ग्रेस टेक वरती नोंदणी झालेल्या फार्मर आयडी जनरेट झालेल्या आणि वैयक्तिक शेतमालक असलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून ही पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिली जात आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालय याचबरोबर भारत सरकार आणि पीएम बी अलायन्स यांच्यामध्ये त्रिसदस्य करार झालेला आहे आणि याच्याच या कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही अगदी एक रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली जात आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यासाठी अप्लाय केल जात आहे शेतकऱ्यांना ही कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे
आणि अशा प्रकारची किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी आपण सुद्धा आपल्या बँकेशी संपर्क करू शकता. मित्रांनो ऑनलाईन पोर्टल आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायला सुद्धा सुरू आहे परंतु याच्यामध्ये ग्रीस स्टॅक वरती ज्यावेळेस शेतकऱ्यांचे कॉन्फिगरेशन ज्यावेळेस त्याचे व्हेरिफिकेशन होत त्यावेळेस त्या पोर्टलवरती काही एरर येतात त्याच्यामुळे आपल्या बँकेकडे संपर्क करून कुठल्याही कागदपत्राशिवाय किंवा कुठल्याही चार्ज शिवाय आपण या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता.
किसान क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायचे त्या शेतकऱ्याच्या नावे कुठलही थकीत पीक कर्ज नसाव तो नवीन पीक कर्जासाठी अप्लाय करत असावा किंवा पूर्वीच पीक कर्ज फेड होऊन तो नवीन कर्जदार होणार असावा याचबरोबर त्या शेतकऱ्याची अग्रेस स्टेक वरती नोंडणी झालेली असावी त्याच्या नावावरती सेपरेट स्वतःच्या मालकीची जमीन असावी याचबरोबर त्या शेतकऱ्याचा त्या अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला असावा अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा बाबी याच्यामध्ये आहेत
आणि या बाबीची पूर्तता करून आपण एक रुपयामध्ये पीक कर्जासाठी या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केसीसी साठी अप्लाय करू शकता तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती 31 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण या योजनेचा आपण या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता धन्यवाद

देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ आणि जलद पद्धतीने कुठल्याही कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 01 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत लाभ
नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज
आधीचे पीक कर्ज फेडलेले शेतकरी → नवीन कर्ज घेण्याची संधी
पशुपालकांसाठी पशु KCC
शेतमाल तारण योजना व अन्य सुविधा
अर्ज करण्याची पद्धत
-
अर्ज जनसमर्थ पोर्टल वर ऑनलाईन करता येईल
-
ग्रीस टेक (AgriStack) वर नोंदणी झालेली असावी
-
शेतकऱ्याचा स्वतःच्या मालकीचा सातबारा (जमीन) असणे आवश्यक
-
आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक
-
अर्जदारावर कुठलेही थकीत कर्ज नसावे
-
Sarkari Yojana – https://sarkariyojana.store/
-
Check Jansamarth KCC Status – https://mhfr.agristack.gov.in/
महत्वाचे मुद्दे
ऑनलाईन अर्जामध्ये कधी कधी ग्रिस स्टॅक व्हेरिफिकेशन एरर येऊ शकतो → अशा वेळी थेट बँकेत संपर्क करा
कोणतेही कागदपत्र किंवा अतिरिक्त शुल्क लागत नाही
फक्त 1 रुपयामध्ये ऑनलाईन अर्ज करून KCC मिळू शकतो
भागीदारी
ही मोहीम केंद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार आणि पीएम बी अलायन्स यांच्या त्रिसदस्यीय कराराअंतर्गत राबवली जात आहे.
शेवटची तारीख
👉 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करून आपण या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता.
किसान क्रेडिट कार्ड मोहीम 2025 FAQs
01 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ही मोहीम राबवली जात आहे.
नवीन शेतकरी, पीक कर्ज फेडलेले शेतकरी, तसेच पशुपालक अर्ज करू शकतात.
जनसमर्थ पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा थेट आपल्या बँकेत संपर्क साधू शकता.
नाही. फक्त 1 रुपयामध्ये अर्ज करता येतो. कुठलेही अतिरिक्त शुल्क किंवा चार्ज नाही.