शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सहकारी सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्ज मिळावे यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता राज्यातील सहकारी सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे बँकांचे कडक निकष आणि खाजगी सावकारांचे जाचक व्याज यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज मिळत नाही, कारण त्यांच्या नावावर जुनी सेटलमेंट असेल, CIBIL स्कोअर कमी असेल किंवा इतर काही कारणं बँका सांगतात. परिणामी, हे शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात, जिथे त्यांना प्रचंड व्याजदर भरावा लागतो, काही वेळा जमिनीही गमवाव्या लागतात आणि या मानसिक तणावामुळे अनेकांना आत्महत्येचे टोक गाठावे लागते.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकांच्या दारात ताटकळत उभं राहावं लागणार नाही, आणि खाजगी सावकारांच्या जाचातूनही मुक्ती मिळणार आहे.

विद्याधर अनास्कर यांच्या माध्यमातून ही माहिती अधिकृतपणे समोर आली आहे, आणि लवकरच सोसायट्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

sarkariyojana.store 

sarkari GR 

सहकारी सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध न करून दिल्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकतात आणि अशाच या खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट समोर आलेला आहे

आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये बँकांच्या माध्यमातून विविध कारणास्तव सिव्हिल स्कोर असेल जुनी पीक कर्ज सेटलमेंट केलेली काही शेतकरी असतील किंवा इतरही काही कारणं सांगून पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात नाहीत आणि अशी पीक कर्ज उपलब्ध न झाल्या ल्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकाराकडे वळतात खाजगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज दर घेतल्या जातात जमिनी लुटल्या जातात किंवा त्यांच्या दबावामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या देखील करावे लागतात

राज्यामध्ये होणाऱ्या आत्महत्यामध्ये खाजगी सावकाराच्या दबावामुळे झालेल्या आत्महत्याचा आकडा देखील खूप मोठा आहे आणि याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात प्रकरण देखील सध्या सुरू झालेल्या सध्या पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात समोर आलेले होते याच्यावरती बराच सारा विषय देखील चर्चेला गेला आणि मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं

की केंद्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा जे काही पीएससीएस अर्थात जे काही प्राथमिक पदपुरवठा करणाऱ्या ज्या सोसायट्या आहेत या सोसायट्यांच पुनर्जीवन करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला होता त्याच्या संदर्भातून पदपुरवठा करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले होते आणि याच्यामध्येच आता शिखर बँकेच्या माध्यमातून सुद्धा एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र शिखर बँकेच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही सोसायट्या आहेत या सोसायट्यांना थेट पदपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर 31जिल्हा सहकारी बँक आहेत याच्यामधल्या बहुतांश बँका या डबघायला आलेल्या आहेत बीड असेल नाशिक असेल किंवा धाराशीव असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या नागपूर सारख्या वर्ध्या सारख्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत या सहकारी बँक आहेत या पूर्णपणे डबगायला आलेल्या येतात याच्यामधून शेतकऱ्यांना पदपुरवठा होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी खाजगी बँका असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत बँक असतील किंवा इतर काही बँकांकडे दरवाजा ठोटावे लागतात

त्याच्यामध्ये बँक पीक कर्ज उपलब्ध करून देत नाही आणि परत हे शेतकरी सावकारी ज्या खाजगी सावकारीकडे वळतात आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणात त्यांना नाहक मनस्ताप असेल किंवा आर्थिक नुकसान देखील सहन कराव लागत अशा या शेतकऱ्यांना जर त्या गावातील सोसायटीच्या माध्यमातून जर पीक कर्ज उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो परंतु हे सर्व करण्यासाठी त्या सोसायट्यांना देखील पद पुरवठा होणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी आता शिखर बँकेच्या माध्यमातून या सोसायट्यांना ज्या सोसायट्यांची कामगिरी चांगली आहे

अशा सोसायट्यांना थेट पदपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच बद्दलची माहिती विद्याधर अनास्कर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो सोसायटीच्या माध्यमातून मिळालेली कर्ज ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत फेड केली जातात त्यांना व्यवस्थित असं एक व्याज देखील भरायला होतं किंवा त्याच्यामध्ये जास्त मोठा तणाव शेतकऱ्यांवरती येत नाही त्याच्या रकमा देखील जास्त असतात आणि पर्यायाने एक शेतकऱ्यांची जी काही खरीपाचे असतील किंवा रबीच्या हंगामापूर्वीची काम असतील ज्या गरजा असतील त्या सुद्धा व्यवस्थितपणे पार पडतात त्याच्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून होणारा पदपुरवठा हा साहजिकच शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक ठरू शकतो

आणि असा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला याची आता व्यवस्थितपणे अंमलबजावणी जर केली तर साहजिकच शेतकऱ्यांना एक नक्की मोठा दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाच अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह.

शेवटी...

सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा ही योजना जर प्रभावीपणे राबवली गेली, तर राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल.

Leave a Comment