शेतजमिनीचा नकाशा, अक्षांश-रेखांश आणि PDF ऑनलाईन कसा पाहायचा? – संपूर्ण मार्गदर्शक 2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आज आपण आपल्या शेतजमिनीचा नकाशा, अक्षांश-रेखांश, आणि लांबी-रुंदीची माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी मिळवायची, तसेच त्याचा PDF कसा डाऊनलोड करायचा, हे या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.

नकाशात काय काय दिसते?

नमस्कार मित्रांनो आपल्या शेतजमिनीचा अक्षांश रेखांश आपल्या शेतजमिनीचा नकाशा या नकाशाची पीडीएफ ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची कशी काढायची हेच आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत

याच्यासाठी तुम्हाला भूमी अभिलेखच्या पोर्टलवरती यायच ज्याची डायरेक्टली लिंक आपल्याला ब्लॉग मध्ये देण्यात आलेली आहे भूमी अभिलेख https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेत स्थळावरती आल्यानंतर आपण भूक्षा आणि इक्षा अशा दोन प्रकारामध्ये मध्ये नकाशा पाहू शकता आता

हे वेब पोर्टल ही वेबसाईट खोलल्यानंतर आपण पाहू शकता इथे एक महाराष्ट्राचा नकाशा दाखवला जातोय या नकाशामधून आपल्या जिल्ह्यावरती जर क्लिक केलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीचे अक्षांश रेखांश दिसणार आहेत आपल्या जमिनीचे जे काही बांध आहेत त्या बांधाची लांबी रुंदी आपण या नकाशाच्या माध्यमातून पाहू शकता

आता हे जे काही ऑप्शन आहे किंवा ही जी काही माहिती आहे ही पाहत असताना याच जे पोर्टल आहे ते अतिशय स्लो असं चालतं या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही त्याची लांबी रुंदी वगैरे पाहू शकता आता आपल्याला पीडीएफ स्वरूपातील नकाशा पाहण्यासाठी इ नकाशा भू नकाशा नावाची जे ऑप्शन दिलेली आहे

याच्यावरती क्लिक करायचे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आणखीन एक पेज खुलणार आहे https://bhumiabhilekh.maharashtra.gov. आता हे पोर्टल खुलल्यानंतर हे पेज खुलल्यानंतर आपण पाहू शकता इथ महाराष्ट्र ऑटोमॅटिक आलेल आहे याच्यानंतर कॅटेगरी देण्यात आलेली आहे

रुलर आणि अर्बन अर्थात नागरी ग्रामीण आणि शहरे आता रुलर म्हणजे आपल्याला ग्रामीण भागातील नकाशा पाहण्यासाठी अर्बन म्हणजे शेहरी भागातील पाहण्यासाठी. आता आपण शेत जमिनीचा पाहणार आहोत. तो रूलर वरती क्लिक करायचय. याच्यानंतर तुम्हाला जिल्हा कुठला सिलेक्टकरायचा तो जिल्हा तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता.

आता उदाहरणार्थ आपण beed  जिल्हा याच्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे. तर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये असलेले तालुके आपल्याला खाली दाखवले जातील. याच्यामध्ये आपण तालुके पाहू शकता आता तालुका आपण एक सिलेक्ट केला तर त्या तालुक्यामधील गाव आपल्याला दाखवली जाणार आहेत आता याच्यामध्ये आपण त्या तालुक्यामधील गाव पाहू शकता

याच्यातून जे गाव घ्यायचे ते आपण गाव याठिकाणी सिलेक्ट केलेला आहे तर गाव सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण गावाचा नकाशा आपल्याला याठिकाणी दाखवला जातोय आता पर्टिक्युलर आपल्याला पूर्ण गावाचा नकाशा पाहायचा नाही एकाच प्लॉटचा पाहायचा आहे इथे खाली प्लॉट नंबर दिलेले त्या गावातले असलेले सगळे प्लॉट नंबर या ठिकाणी दिलेले आहेत

किंवा आपल्याला जर पर्टिक्युलर प्लॉट नंबर माहित असेल सर्वे नंबर माहित असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकता आता आपल्याला 495 नंबर पाहायच आहे तर 495 नंबर क्लिक करून आपल्याला सर्च करायच तर सर्च केल्याबरोबर तो जो काही पर्टिकुलर प्लॉट असेल तो प्लॉट आपल्याला याठिकाणी दाखवला जाणार आहे

समजा आपल्याला दुसरा प्लॉट पाहायचा आहे तर तो प्लॉट नंबर आपण या ठिकाणी सर्च मध्ये टाकू शकतो तर पर्टिक्युलर त्या प्लॉटचा नकाशा आपल्याला याठिकाणी दाखवला जाणार आहे याच्या खाली सुद्धा आपण प्लॉट नंबर दिलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर प्लॉट नंबरन पाहायच असेल तर प्लॉट नंबर याठिकाणी पाहू शकता

जो काही प्लॉट आपल्याला पाहायचा असेल तो प्लॉट आपण याठिकाणी पाहू शकता आता तो प्लॉट पाहिल्यानंतर त्या प्लॉटचा मॅप रिपोर्ट नावाचे ऑप्शन येते त्याचा जमिनीचा मालक कोण आहे त्या जमिनीच क्षेत्रफळ किती आहे ही सर्व माहिती आपल्याला याठिकाणी दाखवली त्याचा नकाशा देखील दाखवला जातोय आता याच्यामध्ये मॅप रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तो नकाशा आपल्याला मोठा होणार आहे  

तो नकाशा मोठा झाल्यानंतर त्याचे जे काही स्केल असतील क्चुअल स्केल काय किंवा त्याची साईज काय दाखवल जाईल आणि याच्यामध्ये त्या भू मालकाच्या नावासह आपण याची पीडीएफ तयार करू शकतो महणजे अशा प्रकारे याची पीडीएफ किंवा याची प्रिंट काढणं हे काम आपल्याला याठिकाणी करता येणार आहे आता ज्या ऑप्शनला आपण पूर्वी सिलेक्ट केलेल होत जस घेतल्या इथ आता सर्व जिल्हे दाखवले जात आहे ज्याच्यामधून आपल्याला आपला अक्षांश रेखांश आणि शेत जमिनीच्या बांधाची लांबी रुंदी काढायची याठिकाणी आपण पाहू शकता इथं

पण आपल्याला सातबारा प्रॉपर्टी गार्ड दाखवलेले किंवा सातबारा पाहायच सातबारा दाखवलेला आहे आपण सातबाराचा पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला परत आणखीन त्याच पद्धतीने ऑप्शन देण्यात आलेले आहेत की आपल्याला जिल्हा कुठला पाहिजे तालुका कुठला पाहिजे त्याच्यामधील कुठल्या गावाचा आपल्याला नकाशा पाहिजे आता त्या गावाचा पर्टिक्युलर नकाशा याठिकाणी लोड झाल्यानंतर आपल्याला त्या गावामधील जो काही प्लॉट असेल ज्या प्लॉटचा आपल्याला हे करायच अक्षांश रेखांश पाहायच नकाशा पाहायचा आहे तो प्लॉट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता आपण समजा एक उदाहरणात प्लॉट याठिकाणी सिलेक्ट केलेला आहे

तर त्या प्लॉट वरती आपण जसा कर्सर आपण मुव्ह करू तसे आपल्याला वरती राईट साईडला या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश बदललेले दाखवले जात आहेत आता याच्यामध्ये जर समजा आपल्याला लांबी रुंदी घ्यायची असेल तर लांबी रुंदी घेता याला डाऊनलोड करायच असेल तर डाऊनलोड करता येणार आता लांबी रुंदी मध्ये आपण पाहू शकता याठिकाणी जर एक पॉईंट पकडला आणि आपण तो कर्सर दुसऱ्या पॉईंट वरती जर क्लिक केला तर याठिकाणी आपल्याला जी काही मीटर मध्ये लांबी असेल ती मीटर मधली लांबी आपल्याला याठिकाणी दाखवली

जाणार आहे

आणि त्याचही प्रिंट काढायचे असेल तर प्रिंट सुद्धा काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचे अक्षांश रेखांश त्याची लांबी रुंदी किंवा पीडीएफ स्वरूपातील नकाशा या पोर्टल वरून डाऊनलोड करू शकता

महत्वाची संकेतस्थळे:

  1. भूलेख पोर्टल:
    https://bhulekh.mahabhumi.gov.in

  2. इ-नकाशा पोर्टल:
    https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in

  3. Sarkariyojana.store

शेतजमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

  1. वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  2. “भू नकाशा” किंवा “इ-नकाशा” या पर्यायावर क्लिक करा.

  3. “रूरल” (ग्रामीण) निवडा – कारण आपली शेती जमिन ग्रामीण भागात असते.

  4. आपला जिल्हा → तालुका → गाव सिलेक्ट करा.

  5. गाव निवडल्यानंतर, त्या गावातील सर्व सर्व्हे नंबर/प्लॉट नंबर दिसतील.

  6. आपला प्लॉट क्रमांक टाका (उदा. 495) आणि Search करा.

PDF/प्रिंट कशी काढायची?

  1. प्लॉट सिलेक्ट केल्यानंतर “Map Report” वर क्लिक करा.

  2. नकाशा मोठ्या स्वरूपात दिसेल.

  3. उजव्या बाजूला “Download PDF” किंवा “Print” पर्याय मिळेल.

  4. यामध्ये स्केल, क्षेत्रफळ, मालकाचे नाव, मोजमाप यासह संपूर्ण माहिती असते.

🙏 धन्यवाद! आपल्या शेतीमालकीचे सर्व कागदपत्र डिजिटल स्वरूपात घेण्यासाठी हे मार्गदर्शन नक्की वापरा आणि शेअर करा!

Leave a Comment