मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत

महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला याचबरोबर लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी एक महत्त्वाची अशी योजना मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये महिला लाभार्थ्यांना तीन गॅसची सबसिडी अनुदान स्वरूपामध्ये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेली होती.  

आणि आता पुढे या योजनेच काय होणार योजना कधी राबवली जाणार याच्या अंतर्गतचा अनुदान कधी येणार अशी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जुलै 2024 पासून राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आली आणि जुलै 2025 रोजी या योजनेला एक वर्ष पूर्ण झालं. मित्रांनो या आर्थिक वर्षातील अनुदान यापूर्वीच वितरित करण्यात आलेल होते.  

आता 2025/26 या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत नावावरती गॅस कनेक्शन असलेल्या आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना हे तीन गॅस सिलेंडरच वितरण होणं अपेक्षित होतं आणि मित्रांनो याच्याचसाठी आता ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जमा केली जाणार आहे.  

आणि याच अनुषंगाने राज्यशासनाच्या माध्यमातून आता प्रत्येक विभागाच्या निधीच वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्यासाठी 10 जुलै 2025 रोजी जे काही आदिवासी विकास विभागाचा निधी आहे तो अनुसूचित जमातीसाठी आवश्यक असणारा निधी हा डीबीटी द्वारे वितरित करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे.

25 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यापैकी 15 कोटी रुपयाचा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. अर्थात या वितरित करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या लाभार्थी ज्या महिला असतील अशा महिलांची ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाच्या अंतर्गतची गॅस सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री उज्वला गॅस सिलेंडर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही गॅसची रक्कम असेल ही रक्कम तीन सिलेंडर साठीची माफ केली जाते.

ज्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक सिलेंडर देण्याची तरतूद आहे आणि वार्षिक अशा तीन सिलेंडर साठीच अनुदान हे लाभार्थ्यांना दिलं जातं आता लवकरच इतर विभागाचे सर्वसाधारण प्रवर्ग असतील अनुसूचित जातीचे असतील हे निधी वितरित केले जातील आणि साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या तिन्ही गॅस सिलेंडरचा अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे क्रेडिट केलं जाईल

1 sarkariyojana.store

2 prabhudeva

धन्यवाद

1 thought on “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत”

Leave a Comment