महाराष्ट्र भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना
राज्यातील भजनी मंडळ, आराध्य मंडळ, शाहीर, तमाशा मंडळ तसेच विविध कलाकारांसाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना.
या योजनेअंतर्गत भजनी मंडळाला भजनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून ₹25,000 इतकं भांडवली अनुदान दिलं जातं.
2025-26 या आर्थिक वर्षात 1800 भजनी मंडळांना हे अनुदान देण्यात येणार आहे.
अर्जाची मुदत: 23 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025
अर्ज भरण्याची वेबसाईट: mahaanudan.org
राज्यातील भजनी मंडळांना राज्य शासनाच्या माध्यमातून भांडवली अनुदान म्हणून 25000 रुपये दिले जातात आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील भजनी मंडळ असतील, आराध्य मंडळ असतील, शाहीर असतील किंवा तमाशा मंडळ असतील किंवा इतर जे काही कलाकार आहेत अशा कलाकारांना मानधन दिले जातात.
वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे भजनी मंडळाला दिलं जाणार भांडवली अनुदान मित्रांनो याच्यामध्ये भजनी मंडळाला हार्मोनियम खरेदी असेल विना असेल टाळ असेल किंवा इतर काही भजनाच साहित्य खरेदी करायच असेल तर त्याच्यासाठी भांडवली अनुदान म्हणून 25000 रुपयाच एक वेळच अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 1800 भजनी मंडळाला हे अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी 23 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत
महा अनुदान या वेबसाईटच्या माध्यमातून हे अर्ज भरवून घेतले जाणार आहेत याची डायरेक्टली लिंक आपल्याला ब्लॉग पोस्ट च्या मध्ये देण्यात आलेली आहे महा अनुदान डॉट ओजी संखेत स्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता याठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शन दाखवल्या जातात ज्याच्यामध्ये संस्था भजनी मंडळ नोंडणी आणि याच्यामध्ये नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा आणि संस्था भजन मंडळी लॉगिन अशा दोन ऑप्शन दिलेले
आता याच्यामध्ये आपल्याला काय आपली जर पहिली नोंदणी झालेली नसेल तर आपल्याला नोंडणी करावी लागेल आणि नोंडणी झालेली असेल तर आपण लॉगिन करू शकता आता नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय विचारल जाणार आहे विभाग विचारला जाणार आहे जिल्हा विचारला जाणार आहे
तालुका विचारला जाणार आहे विभाग आपण सिलेक्ट केल्याबरोबर त्या विभागातील असलेले जिल्हे आपल्याला दाखवले जातील आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या विभागातील असलेले तालुके आपल्याला पुढे दाखवले जाणार आहेत आता आपल्याला जो काही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे
तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जर ग्रामपंचायत नगरपालिका याच्यात दाखवली जात असेल नगरपरिषद सिलेक्ट करायची नसेल तर आपल्याला जे काही गाव आपण निवडलेले तेच नगरपरिषद म्हणून याठिकाणी सिलेक्ट करायचे याच्यानंतर आपल्याला संस्थेचा भजनी मंडळाचे नाव द्यायच याच्यानंतर जे काही आपला पुढचा कायमचा पत्ता असेल भजनी मंडळाचा तो पूर्ण पत्ता याच्यामध्ये द्यायचा आहे
आता ग्रामपंचायत याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे पत्ता आपला याठिकाणी खाली व्यवस्थित द्यायचा आहे याच्या खाली मोबाईल नंबर द्यायचा आहे आता याच्यामध्ये नोंदणीमध्ये जो मोबाईल नंबर आपण द्याल त्याच मोबाईल नंबर वरती ओटीपी येणार आहे आणि तोच मोबाईल नंबर आपला लॉगिन क्रमांक असणार म्हणजे लॉगिनचा युजर आयडी हाच नंबर असणार आहे याच्या खाली आपल्याला ईमेल आयडी एक असणार आहे
तो ईमेल आयडी आपला द्यायचा आहे ईमेल आयडी वरती सुद्धा ओटीपी येणार आहे जर आपण लॉगिन करत असताना मोबाईलवरती ओटीपी नाही आला तर आपल्याला ईमेल आयडी वरती ओटीपी पाठवला जाणार आहे आणि सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला नोंडणी करावरती क्लिक करायच याच्यानंतर आपली नोंडणी सक्सेसफुली होणार आहे
नोंदणी सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला लॉगिन करण्यासाठी सांगितल जाईल आता याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर हा आपला लॉगिन आयडी असणार आहे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवावरती आपल्याला क्लिक करायच मोबाईल नंबर एंटर करून ओटीपी पाठवावरती क्लिक
केल्यानंतर आपल्या मेल आयडीवरती आणि मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करून आपल्याला लॉगिन करायच लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या योजना दाखवल्या जातात भीमसेन जोशी अनुदान योजना सहाय्यक अनुदान योजना भांडवली अनुदान योजना भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना या भजनी मंडळी भांडवल अनुदान योजनेच्या अंतर्गत आपल्याला अर्ज करायचा आहे.
याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्यासमोर एक अर्ज खुलणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती भरण्यासाठी सांगितली जाणार आहे. आता या अर्जामध्ये आपण जर पाहिलं तर आपलं जे काही भजनी मंडळाच नाव आहे ते ऑटोमॅटिक घेतलेल आहे भजनी मंडळाचा पत्ता ऑटोमॅटिक घेतलेला आहे.
याच्यामध्ये आर्थिक वर्ष घेतलेल आहे आपला विभाग घेतलेला आहे जिल्हा घेतलेला आहे तालुका याच्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे सर्व याठिकाणी दाखवलेल आहे. आता याच्यानंतर भजनी मंडळाच्या बँकेच्या अकाउंटच्या डिटेल याठिकाणी मागितलेल्या आहेत.
भजनी मंडळाच्या बँकेचा आयएफएससी कोड काय मंडळाची शाखा कोणती आहे? त्याचा खाते नंबर काय आहे? बँक धारकाच नाव काय त्याच्यानंतर बँक खाते नंबर कन्फर्म करायचा आहे. भजनी मंडळाचा पॅन कार्ड नंबर कंपलसरी मागितल जाणार आहे. भजनी मंडळ व्यवसायिक आहे
का असेल तर हो करायच नसेल तर नाही करायचे भजनी मंडळाचे कार्यक्षेत्र निवडायच आता ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जे काही असेल ते कार्य क्षेत्र त्या ठिकाणी निवडायचे याच्यानंतर मागील तीन वर्षामध्ये काही उल्लेखनीय कामगिरी केली आहे का काही तशा पेपरमध्ये न्यूज वगैरे आल्या होत्या का ती माहिती याठिकाणी द्यायची आहे त्याच्यानंतर कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी थोडक्यात द्यायची आहे
भजनी मंडळातील सदस्याची संख्या आतापर्यंत कार्य केलेल्या कार्यक्रमाची माहिती एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची माहिती याच्यानंतर ग्रामपंचायत चा दाखला भजनी मंडळ असल्याबद्दलचा ग्रामपंचायतचा एक दाखला याच्यामध्ये द्यावा लागतो केलेल्या कार्यक्रमाचे काही छायाचित्र असतील जे काही वर्तमान पत्रामधून वगैरे आलेले कातरण असतील ते या ठिकाणी जोडू शकता
त्याच्यानंतर आपल्याला आयोजकाचे पत्र कोणी जर इन्विटेशन कार्ड दिलेले असतील इन्विटेशन कार्ड लागणार आहेत आपला कार्यक्रम करण्यासाठी त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका त्याच जे काही जाहिरातीची कात्रण असतील अशा प्रकारची सर्व कागदपत्र माहिती याच्यामध्ये आपल्याला जोडायचे आहे आणि माहिती जोडल्यानंतर आपल्याला वर दिलेली कागदपत्र ही सर्व बरोबर आहेत याच्यामध्ये जोडलेली माहिती सर्व बरोबर आहे.
याच्यामध्ये जर माहिती चुकीची जोडली तर आमच्यावरती कारवाई होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे अशाप्रकारे या ठिकाणी सोया घोषणाला टिक करून नोंदणी करावरती क्लिक करायच नोंदणी करावरती क्लिक करून हा अर्ज आपल्याला याठिकाणी सादर करायचा आहे आणि याच्यामधून पात्र करण्यात येणाऱ्या आता याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया लावलेकशा प्रकारे काम करतय भजनी मंडळाची सर्व माहिती पाहिल्यानंतर त्याच्यामधून जे काही पात्र भजनी मंडळ असतील अशा 1800 भजनी मंडळांना हे अनुदान दिलं जाणार आहे.
तर आपण देखील भजनी मंडळात असाल आपल भजनी मंडळ असेल आणि आपल्याला जर असं काही साहित्य खरेदी करण करायच असेल तर त्याच्यासाठी या भांडवली अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
भजनी मंडळाने अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत –
-
भजनी मंडळाचा ग्रामपंचायत/नगरपरिषद प्रमाणपत्र
-
बँक खात्याची माहिती (IFSC कोड, खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव)
-
पॅन कार्ड नंबर
-
मागील 3 वर्षातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती
-
केलेल्या कार्यक्रमाचे फोटो, वर्तमानपत्रातील कात्रणं
-
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका (Invitation Card)
-
आयोजकाचे पत्र
-
sarkari yojana – https://sarkariyojana.store/
निष्कर्ष
जर आपण भजनी मंडळ चालवत असाल आणि आपल्याला भजनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करायचं असेल तर ही योजना नक्कीच उपयुक्त आहे.
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या ₹25,000 भांडवली अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ठरलेल्या कालावधीत अर्ज करा आणि आपल्या मंडळाच्या कार्याला बळकटी द्या.