बांधकाम कामगारांसाठी खुशखबर – महाबीओसीडब्ल्यू नोंदणी व नुतनीकरण मोफत

बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा

नमस्कार मित्रांनो,
राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. महाबीओसीडब्ल्यू (महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) कडे केली जाणारी नोंदणी आणि तिचे नुतनीकरण आता पूर्णपणे निशुल्क करण्यात आले आहे.

जीआरची तारीख व माहिती

13 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाने अधिकृत जीआर निर्गमित करून हा निर्णय जाहीर केला. याआधी नोंदणीसाठी ₹25 आणि नंतर ₹1 इतके शुल्क आकारले जात होते. मात्र आता ते पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.

महाबीओसीडब्ल्यूचे लाभ

या मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी 29 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात —

  • शैक्षणिक सहाय्य योजना

  • आरोग्य सहाय्य योजना

  • आर्थिक सहाय्य योजना

  • सामाजिक सुरक्षा योजना

यासाठी कामगारांची नोंदणी किंवा नुतनीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया आता सोपी

आता नोंदणी आणि नुतनीकरण दोन्ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होतील आणि कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे राज्यातील हजारो बांधकाम कामगारांना थेट फायदा होईल.

जीआर कुठे पाहावा?

अधिकृत जीआर तुम्ही https://gr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाहू शकता.   sarkariyojana 

नमस्कार मित्रांनो आता राज्यातील बांधकाम कामगारांना महाबीओसी डब्ल्यू अर्थात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केली जाणारी नोंदणी आणि केलेल्या नोंदणीचे नुतनीकरण निशुल्क करता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 13 ऑगस्ट 2025 रोजी राज्यशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना महाबीओसीडब्ल्यू च्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात आणि याच्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असणं गरजेच आहे. ती नोंदणीच नुतनीकरण झालेल असणं गरजेच              आहे. अर्थात जीवित नोंदणी असणाऱ्या लाभार्थ्यांना विविध योजना राबवल्या जातात.

ज्याच्यामध्ये 29 प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात. याच्यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना असेल आरोग्य विषय योजना असेल आर्थिक सहाय्य योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि याच्यासाठी बांधकाम कामगाराची नोंडणी झालेल असणं किंवा त्या नोंडणीच नुतनीकरण झालेल असणं गरजेच आहे.

याच्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून 25 रुपयाच शुल्क आकारल जात होतं मात्र याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्यशासनाच्या माध्यमातून ही नोंडणी करण्यासाठी बदल करण्यात येऊन या नोंडणीसाठी आणि नुतनीकरणासाठी एक रुपयाच शुल्क आकारल जात होतं याच्यासाठी 6 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम कामगाराची नोंडणी किंवा त्याच नुतनीकरण हे निशुल्क करण्यासाठीचा एक ठराव पारित करण्यात आलेला होता

आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज 13 ऑगस्ट 2025 रोजी एक जीआर निर्गमित करून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवन शरती अधिनियम 1996 मधील कलम 12ती कलम 62 जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अर्थात महाबीओ सीडब्ल्यू कडे नोंदणी आणि नूतनीकरण करण्याकरता भरावयाची नोंदणी आणि नुतनीकरण फी अर्थात नोंदणी शुल्क हे निशुल्क करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

अर्थात आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना नुतनीकरण करत असताना कुठल्याही प्रकारच शुल्क हे बांधकाम कामगारांना भरायचं नाहीये मित्रांनो या योजनांच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहे याच्यासाठीचे अर्ज बांधकाम कामगाराला कराव्याची नोंडणी त्याच नुतनीकरण हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केल जात आहे

आणि आता या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या नोंडणी आणि नुतनीकरणासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही याच्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळणार मित्रानो अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा आज 13 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे जो आपण https://gr.maharashtra.gov.in/ या संखेत स्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला ब्लॉग पोस्ट मध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद

निष्कर्ष

हा निर्णय बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी आर्थिक आणि प्रशासकीय दिलासा ठरणार आहे. नोंदणी व नुतनीकरण पूर्णतः मोफत झाल्यामुळे अधिकाधिक कामगार या योजनेच्या लाभांपर्यंत पोहोचतील.

FAQs – MahaBOCW Free Registration & Renewal

MahaBOCW stands for Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board. It provides various welfare schemes for registered construction workers in Maharashtra.

The Maharashtra Government has announced that MahaBOCW registration and renewal will now be completely free for all eligible construction workers.

Yes. Earlier, ₹25 was charged for registration. Later, it was reduced to ₹1. Now, the fee has been completely removed.

Any eligible construction worker working in the building and other construction sector in Maharashtra can register under MahaBOCW to avail welfare scheme benefits.

Registered workers can get benefits from 29 welfare schemes such as educational assistance, healthcare assistance, financial aid, and social security schemes.

Leave a Comment