खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी मध्ये राज्यभर मान्सूनचा लहरीपणा दिसून येत आहे. एप्रिल–मे–जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाचा खंड पडला. परंतु आता ऑगस्ट 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कोणत्या भागात मोठे नुकसान?

  • खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी

  • मराठवाडा (काही जिल्हे)

  • अमरावती विभाग

  • विदर्भातील काही जिल्हे

  • सोलापूर जिल्ह्याचा काही भाग

  • पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग

  • अहमदनगरचा काही भाग

या भागात मूग, उडीद, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

कोणत्या पिकांना जास्त फटका?

  • मूग : तोंडणीला आलेल्या मुगाचं सर्वात जास्त नुकसान.

  • उडीद व सोयाबीन : काही प्रमाणात वाचण्याची शक्यता.

  • तूर : पाण्याखाली आल्यानंतर ओमाळण्याचा धोका.

  • कापूस : सततच्या पावसामुळे प्रतिकूल परिणाम.

खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान – शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

  • आपल्या कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधा.

  • झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घ्या.

  • शासनाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पाठपुरावा करा.

  • जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या सूचनांनंतर पंचनामे अधिकृतरीत्या सुरू होतील, पण त्याआधीही आपली नोंद करणे महत्वाचे.

  • नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये सुद्धा मान्सूनचा मोठ्या प्रमाणात लहरीपणा दिसून येतोय आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या याच्यानंतर काही दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि पुन्हा एकदा या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला राज्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळालेली आहे.

    याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे असतील अमरावती विभाग असेल विदर्भातील काही जिल्हे असतील किंवा इकडे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल अहिल्यानगरचा काही भाग असेल या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतय आणि याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर खरीपाची पीकं ज्याच्यामध्ये मुख्यतः मूग उडीद आणि सोयाबीन या पिकांच आता नुकसान दिसून यायला सुरुवात झालेली आहे.

    मूग तोंडणीला आलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता मुगाच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उडीत सोयाबीन जरी वाचले तरी मूग मात्र शेतकऱ्यांच्या हाती लागू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर पिकं आता तुरीची पिकं सुद्धा पाण्याखाली आल्यानंतर ते तूर ओमाळले जाऊ शकते किंवा इतर काही त्याच्यावरती दुष्परिणाम दिसून येऊ शकतात कापसावरती परिणाम होऊ शकतात अशा सर्व परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे अतिवृष्टी झालेली असेल पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा गेल्या पाच दिवसापासून सलगचा सततचा पाऊस असेल अशा कारणामुळे जर आपल्या शेती पिकांच नुकसान दिसून येत असेल तर आपल्या तात्काळ कृषी सहायक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या आपल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा.

    खरीप हंगाम 2025 मध्ये जो पीक विमा दिला जाणार आहे तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसांना नुकसान होतय त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पंचनामे केले जातात नुकसानाचा आता जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यामध्ये जर ती गाव बाधित दिसली तर पुढे पीक कापणीच्या टाईमाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आणि शासनाच्या माध्यमातून जी काही आता समजा अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे जर या पिकांचं नुकसान जर जास्त दिसून आलं आणि जर मदत दिली तर ती मदत सुद्धा या पंचनाम्याची आधारेच मिळू शकते

    त्याच्यामुळे आपलं जर नुकसान झालेल असेल तर शासनाच्या कुठल्याही आदेशाची किंवा शासनाच्या प्रशासनाच्या कुठल्याही आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी आपल्या कृषी सहायकाग्रह या पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा.

    लवकरच याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतय. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान होत त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाला काही सूचना देतील आणि तहसीलदारांच्या माध्यमातून त्या तालुक्यामधील त्या भागातील जी काही असलेली गाव असतील जे नुकसानग्रस्त मंडळ असतील त्याचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाला सांगितल जाईल तोपर्यंत आपली जबाबदारी आपण नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास नुकसान भरपाई असेल किंवा सरते शेवटी जो काही पिकवीमा असेल तो सुद्धा मिळण्यासाठी मदत होईल धन्यवाद

पंचनाम्याचं महत्त्व

  • पंचनाम्याच्या आधारेच पीक विमा दाव्याची गणना होईल.

  • शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई (Ativrushti Madat / Flood Relief) मिळण्यासाठी हा कागदोपत्री पुरावा ठरणार.

  • खरीप हंगाम 2025 मध्ये पिकविमा पीक कापणी अहवालावर आधारित दिला जाणार असल्याने आत्ताच केलेला पंचनामा फार महत्त्वाचा आहे.

  • sarkari yojana –  https://sarkariyojana.store/

  • pmfby app – https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&hl=en-US

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आपल्या शेताचं नुकसान त्वरित पंचनाम्यात नोंदवा. हेच पुढे नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळवण्यासाठी मदत करणारं पाऊल ठरेल.

Leave a Comment