कोळप्याला जुपलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी – पण बाकीच्यांचं काय?

प्रस्तावना

हडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील 75 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार यांचा स्वतःला कोळप्याला जुंपून शेतात काम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओने देशभरातील मन हेलावून टाकली. अनेक नेते, माध्यमं, कार्यकर्ते त्यांच्या भेटीला गेले, आणि शेवटी राज्य सरकारने त्यांचं ₹40,000 कर्जमाफी  केली.

पण प्रश्न असा की – ही मदत फक्त चर्चेत आलेल्यांपुरतीच का?

लाखो शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात अडकलेत. कुणी फासावर गेलेत, कुणी अजून झुंज देतायत. मग एका व्हिडिओमुळे एकाच्या नशिबात दिलासा आला, पण उर्वरितांचं काय?

शेतकऱ्यांचं वास्तव:

  1. शेतमालाला भाव नाही.
  2. खते, बियाण्यांचे दर गगनाला भिडलेत.
  3. नवीन कर्ज मिळत नाही. जुने कर्ज वाढतेय.
  4. इमानदारीने कर्ज फेडणाऱ्यांना दंडाचा अनुभव.
  5. जमिनी गहाण – सावकाराचा सापळा.

लोकप्रतिनिधी, पक्ष आणि प्रशासन यांची भूमिका:

  • एक फोटोशूट पुरेसं वाटतं.
  • शेतकऱ्याच्या घरी जाऊन सहानुभूतीचं सोंग.
  • संसद/विधानसभेत चर्चा – मग फाईल कुठं गहाळ?

मागण्या काय?

  1. एकसंध कर्जमाफी धोरण – राजकीय प्रसिद्धी नको, धोरण हवा!
  2. जुने व नवीन कर्ज घेणाऱ्या दोघांना न्याय.
  3. वेळेत कर्ज उपलब्ध करून देणं.
  4. बँक व साहुकार यांचं मॅन्युप्युलेशन थांबवणं.
  5. इमानदारीने कर्ज फेडणाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना.
  6. नवीन माहिती साठी  sarkariyojana.store
  7.  parbhudeva

सविस्तर अशी ही माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर स्वतःला बैलाच्या ऐवजी कोळपेला झुंकून शेतामध्ये कोळपे चालवणारे शेतकरी वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार राहणार हडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांची शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली आहे म इतर शेतकऱ्यांच काय मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ज्याच्यामध्ये हडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी वय 75 वर्ष अगदी चालणही मुश्किल अशा परिस्थितीमध्ये असलेले शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये बैल नसल्यामुळे किंवा बैलाचा खर्च परवडत नसल्यामुळे कोळप्याला स्वतःला जुंपून शेतामध्ये कोळपचालवत होते.

हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला सर्व स्तरावरून एक हळळ व्यक्त करण्यात आली दुःख दाखवण्यात आलं बरेच सारे आजूबाजूचे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा चमकू नेते वगैरे त्या ठिकाणी आले कोळपी चालवली फोटोगिरी केली व्हिडिओ वगैरे काढले आणि हळूहळू ही बाब एवढी व्हायरल झाली एवढी पसरली की सर्व स्तरावरून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली बरेच रील व्हिडिओ वगैरे वगैरे झाले शेवटी हा विषय विधान भवनापर्यंत पोहोचला आणि सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या विषयाच गांभीर्य दाखवून देण्यात आले की शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय बऱ्याच साऱ्या मीडिया त्यापर्यंत पोहोचल्या शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारले गेले शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होत.

की शेतमालाला भाव नाही सध्या खताच्या असलेल्या किंमती शेतमालाला न मिळणारा भाव कर्ज कर्जाखाली दबलेला शेतकरी एक वस्तुस्थिती मानण्यात आली त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी किंवा शेतमालाला भाव मिळावा ही केलेली मागणी दाखवण्यात आली आणि या सर्वांच्या वरती कुठेतरी विरोधी पक्षाच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात आला.  

खूप सारा विषय याच्यावरती चर्चेला गेला आणि या पार्श्वभूमीवरती आता हे जे काही चाललेलं खूप सार वायरल झाले आणि योग अस की राज्याचे सहकार मंत्री हे त्याच मतदारसंघातून येतात मग सहकार मंत्र्यांनी आज त्या शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांच्याच मतदारसंघातील ते शेतकरी त्यांची भेट घेतली आणि त्या शेतकऱ्याचा असलेलं 40 हजार रुपयाच कर्ज हे भरून त्या शेतकऱ्याला नील करण्यात आलं.  

आता एका शेतकऱ्यान स्वतःला कोळप्याला जुंपलं आणि त्या शेतकऱ्याची ही जी काही चर्चा झाली म्हणून त्या शेतकऱ्याच कर्ज नील करण्यात आलं पण याच्यापूर्वी जवळजवळ 700 शेतकरी हे गेल्या काही महिन्यामध्ये फासावरती लटकलेयेत आणखीन असे काही शेतकरी जे डिप्रेशन मध्ये येतात.  

असे काही शेतकरीत आणखीन हजारो की जे दाव हातात घेऊन फक्त लटकायला जागा शोधतात मग जर एखाद्या शेतकऱ्या जर स्वतः कोळप्याला जर जुंपलं किंवा जर परिस्थिती त्या शेतकऱ्याची जर समोर आली तरच जर कर्जमाफी होणार असेल तर मग बाकी शेतकऱ्यांच काय होणार.  

हा एक विषय जो समोर आलाय आणि या समोर आलेल्या विषयाच गांभीर घेऊन बच्चूकडू यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं समिती गठीत करू हे करू ते करू आश्वासन देण्यात आली परंतु एकंदरीत आज किततेेक असे शेतकरी ज्यांची मुलं शाळेत जात नाहीत किंवा ती मुलं शेतात काम करतायत कारण डोक डोक्यावरती कर्ज आहे बरेच सारे

जण जमिनी गहान ठेवतात ्याच्याकडून काढ त्याला दे त्याच्याकडून काढून ह्याला दे रेगुलर असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा जी काही पूर्ण कर्ज आहेत नील केलेली ते कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज उपलब्ध करून द्यायला सुद्धा उशीर केले जातात.  

या सगळ्या भयान अशा परिस्थिती राज्यामध्ये आहेत मग कुठेतरी एक शेतकरी चर्चेत आला म्हणून त्या शेतकऱ्याचा कर्जमाफ करायचं आणि पुन्हा त्याच्या 50 न्यूज चॅनलला बातम्या दाखवायच्या त्याचे फोटोगिरी वगैरे वगैरे करायचे हा एक निवळ भंकस पणा आहे वस्तुस्थिती समोर आलेली आहे एक भयान असं वास्तव समोर आलेले आहे.

त्या शेतकऱ्याचे कर्जमाफ होणं गरजेचं होतं त्या शेतकऱ्याला दिलासा मिळणं गरजेच होतं पण असे लाखो शेतकरी येतात की जे आज अगदी शेवटच्या टोकावरती आहेत की जिथून ते कधीही कोसळून खाली पडू शकतात कणा पूर्णपणे मोडलेला आहे तर गांभीर्य कुठेतरी शासनाने याच जाणून घेणे गरजेचे आहे विरोधी पक्षाने सुद्धा फक्त मर्यादित राहून टीका टिप्पण्या न करण्यापेक्षा या वस्तुस्थितीला धरून कुठेतरी मोठा आवाज उठवणे गरजेचे आहे सर्व लोकप्रतिनिधीने एक होणं गरजेचे आहे शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.  

आणि कुठेतरी अशा या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक मार्ग यातून काढून देणं गरजेच आहे तर कर्जमाफी ही फक्त एका शेतकऱ्याची किंवा एका ठिकाणी किंवा जे चर्चेत आता उद्या एखादा शेतकरी फासावरती लटकायला निघाला आणि लटकण्यापूर्वी तो फक्त लटकला आणि मेला नाही अशा एखाद्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आला तर त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन द पाच रुपये देणं त्याचा सांतवन करणं हा पर्याय नाहीये कुणीही शेतकऱ्यांन टोकाचा पाऊल उचलू नये कुठल्याही शेतकऱ्यावरती असे दिवस येऊ नयेत असं जर वाटत असेल तर शासनाच्या माध्यमातून ताबडतोप याच्यावरती काहीतरी पावलं उचलणं गरजेचे आहे सध्याच्या घडीला.  

जोपर्यंत कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नवी जुनी कर्ज असेल त्या कर्जामध्ये वाढ असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी इमानदारीने आपली कर्ज भरलेली आहे त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून बरेच सारे जिल्हेत आता नाव आणि तालुक्या गावासह बँकेसहित कुठेतरी भांडा पुढं गरजेचे आहे की शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावले जातात आणि भरलेले कर्ज कुठेतरी सावकाराकडून घेतली जातात किंवा बँकेकडून कोणीतरी अधिकारी त्याच्यामध्ये सेटिंग करतात आणि पुन्हा नवीन उपलब्ध करून द्यायला उशीर करून त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा कुठेतरी एका या आर्थिक विवंचनमध्ये अडकवतात.

अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका शेतकऱ्याच कर्जमाफ हा पर्याय नाही राज्यातील लाखो प्रतीक्षित असलेले शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि कर्ज उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शेतकरी पुढच जीवन कमीत कमी जगण्याची आशा तरी मनामध्ये बाळगू शकतो.

निष्कर्ष:

शेतकऱ्याला कोळप्याला झुंपायला लागू नये, फासावर जावं लागू नये – हाच शासन, समाज आणि लोकप्रतिनिधींचा खरा धर्म असायला हवा.

शेतकरी कर्ज माफी Faqs

अंबादास पवार हे लातूर जिल्ह्यातील 75 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी असून, त्यांनी स्वतःला कोळप्याला जुंपून शेतात नांगर चालवला. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सरकारकडून त्यांच्या ₹40,000 कर्जाची तातडीने माफी करण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक मंत्री आणि प्रशासन यांचा सहभाग होता.

सध्या फक्त चर्चेत आलेल्या काही शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. परंतु शासनाच्या वतीने अजून व्यापक निर्णय झालेला नाही.

शेतमालाला भाव नाही, खते-बियाण्यांचे दर वाढलेत, बँका नवीन कर्ज देत नाहीत, आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हजारो शेतकरी अजूनही कर्जबाजारी अवस्थेत आहेत.

शेतकऱ्यांनी पूर्वीचं कर्ज भरलेलं असलं तरी नवीन कर्ज मिळवण्यासाठी अनेकदा बँकांकडून टाळाटाळ केली जाते. शासनाने यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणणे आवश्यक आहे.

होय. अनेकदा अशा घटनांवर फोटोसेशन, चर्चासत्रे, आश्वासनं दिली जातात, पण दीर्घकालीन निर्णय घेतले जात नाहीत.

धन्यवाद

Leave a Comment