ई-पीक पाहणी 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती!

🙏 नमस्कार शेतकरी बांधवांनो,

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असा ई-पीक पाहणी 2025 प्रकल्प खरीप हंगामासाठी सुरू झाला आहे!

मुदत: 1 ऑगस्ट 2025 ते 15 सप्टेंबर 2025

या काळात आपण आपल्या शेताच्या सातबाऱ्यावर असणाऱ्या खरीप हंगामातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अ‍ॅप किंवा पोर्टलद्वारे करू शकता.

कशी कराल ई-पीक पाहणी?

  • आपल्या मोबाईलमधून ‘ईपीक पाहणी’ अ‍ॅप डाउनलोड करा.

  • किंवा जवळच्या सेतू केंद्र, मित्र, कृषी सहाय्यक यांच्याकडून मदत घ्या.

  • शेवटची मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे, त्यामुळे वेळेत नोंदणी पूर्ण करा.

  • sarkariyojana.store

  • E PIk Phani aap Link  https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en-US

ई-पीक पाहणी 2025 संदर्भातील महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंदवण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे इपीक पाहणी मित्रांनो ईपीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामा करता राज्यातील शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी ईपीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

या मुदतीच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु 1 ऑगस्ट पासून सुरू होणारे प्लिकेशन काही तांत्रिक कारणास्तव सुरु करण्यात आलेलं नव्हतं याच्यामध्ये शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्यासाठी लॉगिन करता येत नव्हतं.

याच्याच मध्ये आता हे प्लिकेशन अपडेट करण्यात आलेल आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना आता ईपीक पाहणी 2025 अंतर्गत खरीप हंगामातील आपल्या निर्भेळ पिकासाठी आपल्या कायम पडीसाठी आपल्या जे काही तात्पुरती पड असेल विहीर असतील बोर असतील याची ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे एपी पाहणे कारण शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे लाभ असतील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई असेल किंवा भावांतर योजना असेल अशा सर्व योजनांचे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ईपीक पाहणी होणं अतिशय गरजेचं असतं आणि याच्याच अंतर्गत आता खरीप हंगाम 2025 करता ही ईपीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे.

प्लिकेशन नवीन आहे अपडेट झालेल प्लिकेशन आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि लोड जास्त असल्यामुळे साहजिकच याच्यामध्ये काही आता तांत्रिक बिगाड सुद्धा वेळोवेळी येणार आहे इथ ईपीक पाहणीची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर 2025 आहे.

ईपीक पाहणी जशी जशी हळूहळू सुरळित होईल तशी तशी आपली ईपीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो ईपीक पाहणी ही अतिशय महत्त्वाची आहे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत करून घ्या. याच्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांची इपीक पाहणी बाकी राहील त्यांची इपीक पाहणी ही जे काही इपीक पाहणी सहाय्यक असतील त्यांच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे परंतु ईपीक पाहणी आपली सहायकाच्या माध्यमातून करून घेण्याचा वाट पाहू नका आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या जवळच्या मित्रांच्या माध्यमातून इतर काही जे पीक पाहणी करून देत असतील त्यांच्या माध्यमातून आपल्या पिकांची ताबडतोप पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद

ईपीक पाहणी 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

ईपीक पाहणी 2025 साठी 1 ऑगस्ट 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळ दिली आहे.

ईपीक पाहणी ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर घेतलेल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सरकारी प्रणाली आहे. यामध्ये सातबाऱ्यावर पिकांची माहिती भरली जाते.

पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान, भावांतर योजना, व शेतकऱ्यांसाठी असलेल्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ईपीक पाहणी अनिवार्य आहे.

  • मोबाईलमधून ‘ईपीक पाहणी’ अ‍ॅप डाउनलोड करा.

  • त्यामध्ये लॉगिन करून सातबाऱ्याची व पीक माहिती भरा.

  • किंवा जवळच्या सेतू केंद्र, मित्र, किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून करवून घ्या.

जर पीक पाहणी केली नाही, तर शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही – जसे की पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान इत्यादी.

1 ऑगस्ट रोजी अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, पण आता अ‍ॅप अपडेट करण्यात आले आहे. तरीही लोड जास्त असल्यास थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा.

15 सप्टेंबर 2025 नंतर ईपीक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून करण्यात येईल. पण स्वतः करून घेणं फायदेशीर ठरेल.

  • शेताचा सातबारा

  • पीकाचे नाव

  • क्षेत्रफळ

  • पाणी स्रोत (विहीर/बोर/कायम पड/तात्पुरता पड)

💬 तुमच्या परिसरातील शेतकरी मित्रांनाही ही माहिती जरूर शेअर करा. आपली पीक पाहणी वेळेत करा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या! धन्यवाद! 🙏🌱

Leave a Comment